महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामात आरसीबीच्या ताफ्यातून मैदानात उतरणाऱ्या एलिस पेरीची जादू पाहायला मिळत आहे.
यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात तिच्या भात्यातून आणखी एक दमदार खेळी आल्याचे पाहायला मिळाले. तिने या सामन्यात नाबाद ९० धावांची खेळी केली.
WPL च्या इतिहासात आतापर्यंत कुणालाही शतकी खेळी करता आलेली नाही. पेरीनं या क्लास इनिंगसह तो ऐतिहासिक क्षण लवकर पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पेरीची विक्रमी शतकाची संधी हुकली असली तरी तिने वुमन्स प्रीमिअर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने मेग लेनिंगला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहेय
ती WPL मध्ये ८०० धावांचा पल्ला गाठणारी पहिली बॅटर ठरलीये. तिच्या खात्यात आतापर्यंत ८३५ धावा जमा झाल्या आहेत.
भारतीय टी-२० लीग स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डशिवाय तिने सर्वाधिक ७ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्मही आपल्या नावे केलाय. मेग लेनिंग हिनेही ७ वेळाच अशी कामगिरी केली होती.
यंदाच्या हंगामात पेरी ज्या अंदाजात खेळताना दिसतीये, ते पाहता ती सरशेवटी आपल्या नावावर अनेक विक्रम नावे करणार याचे संकेत मिळतात.
सर्वात आधी १००० धावांचा टप्पा गाठण्यासोबतच स्पर्धेतील पहिलं शतक ठोकण्याचा पराक्रम ती करून दाखवणार का ते पाहण्याजोगे असेल.