Cricket Buzz»फोटो गॅलरी »WPL 2024: ४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात स्पर्धेबाहेरWPL 2024: ४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात स्पर्धेबाहेर By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 12:55 PMOpen in App1 / 11महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबईने ७ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2 / 11मुंबई १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने ७ विकेट राखून विजय मिळवला. 3 / 11मुंबई इंडियन्सचा ७ सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या.4 / 11गुजरातने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात मुंबईने १९.५ षटकांत ३ विकेट गमावून लक्ष्य गाठले. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक झळकावले. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघही ठरला आहे.5 / 11गुजरात जायंट्सला पराभूत करून मुंबईने क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईने सात सामन्यांमधील ५ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. आताच्या घडीला दिल्ली दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या आणि यूपी वॉरियर्स चौथ्या स्थानी आहे. तर गुजरातचा संघ तळाशी आहे.6 / 11शनिवारी गुजरात जायंट्सकडून प्रथम फलंदाजी करताना हेमलताने ७४ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय बेथ मुनीने ६६ धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला २० षटकात ७ बाद १९० धावा करता आल्या. 7 / 11मुंबईकडून गोलंदाजी करताना सायका इशाकने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर हेली, सजीवन, पूजा आणि शबनीम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.8 / 11प्रत्युत्तरात १९१ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या हिली मॅथ्यूज आणि यास्तिका यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये ५० धावांची भागीदारी झाली. 9 / 11यास्तिका ४९ धावा करून बाद झाली तर मॅथ्यूज १८ धावा करून तंबूत परतली. तर नताली सीव्हर अवघ्या २ धावा करून बाद झाली. 10 / 11संघ अडचणीत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने ९५ धावांची नाबाद खेळी केली. तिच्या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. हरमनच्या खेळीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकला आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले. या पराभवासह गुजरातचा संघ स्पर्धेबाहेर झाला. 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications