Join us  

WTC Final 2023 : पराभवानंतर रोहित शर्माच्या वक्तव्यावरून वाद; हरभजन म्हणाला, "फायनल तर एकाच...."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 9:23 AM

Open in App
1 / 8

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मानं 'बेस्ट ऑफ थ्री'च्या आधारे डब्ल्यूटीसी फायनल आयोजित करण्याबाबत वक्तव्य केलं. पण त्याचं हे वक्तव्य सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग यांना आवडलेलं नाही.

2 / 8

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा पराभव पाहायला लागला. गेल्या वेळी न्यूझीलंडनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव केला होता. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला.

3 / 8

फायनलमध्ये बेस्ट ऑफ थ्री असलं पाहिजे, असं सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता. म्हणजेच ३ सामन्यांचं फायनल असलं पाहिजे. त्याच्या या वक्तव्यावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 8

हा अंतिम सामना आहे हे तुम्हाला खूप आधीच माहीत असतं. फक्त १ सामना होणार आहे आणि तुम्ही त्यानुसार सामना खेळायला जाता. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्याच पद्धतीनं तयारी करून मैदानावर उतरायला हवं, अशी प्रतिक्रिया सुनील गावस्कर यांनी टीव्ही टुडेशी बोलताना दिली.

5 / 8

ज्या प्रकारे तुम्ही आयपीएलच्या फायनल मॅचची तयारी करता तसंच याचीही करा. आयपीएलसाठी तर तुम्ही ३ फायनल असाव्या असं म्हणत नाही. प्रत्येकाचे वाईट दिवस असतात. कोणाचे एक-दोन दिवस खराब जातात. पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच तुम्हाला माहित असतं तुम्ही कोणता सामना खेळण्यासाठी उतरला आहात, असं ते म्हणाले.

6 / 8

तुम्ही असं बिलकुल करू शकत नाही. तुम्ही बेस्ट ऑफ थ्री ची मागणी करू शकत नाही. आज बेस्ट ऑफ थ्री ची मागणी होतेय. उद्या बेस्ट ऑफ फाईव्हची मागणी होईल, असं म्हणत गावस्कर यांनी टीका केली.

7 / 8

दरम्यान, यावर हरभजन सिंग यानंही प्रतिक्रिया दिली. मी सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. तुम्हाला आधीच मॅचची तारीख सांगण्यात आली होती. या फायनलबाबत तुमच्याकडे सर्व माहिती होती आणि फायनल तर एकाच मॅचची असते. फायनल कधी तीन मॅचची असू शकत नाही, असं हरभजन म्हणाला.

8 / 8

मला केवळ इतकंच विचारायचंय ५० षटकांच्या वर्ल्डकपचं काय. तुम्हाला तिकडेही ३ फायनल हव्यात का. जर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड असा सामना झाला तर तुम्ही काय उत्तर द्याल. तेव्हा केवळ एकच फायनल चालेल असं म्हणणार का. यामुळेच ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये एक फायनल तर टेस्ट चॅम्पिअनशिपमध्येही एकच फायनल. टेनिल आणि फुटबॉलसारख्या इव्हेंटमध्येही एकच फायनल सामना असतो असंही तो म्हणाला.

टॅग्स :रोहित शर्माजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धासुनील गावसकरहरभजन सिंग
Open in App