WTCच्या गुणतालिकेत द. आफ्रिका नंबर १; भारताला मोठा धक्का, बांगलादेश, पाकिस्तानही पुढे!

WTC points table: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे.

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. भारतीय संघाची WTCच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

मालिका सुरू होण्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेली टीम इंडिया आता सहाव्या स्थानावर आली आहे. पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती.

WTCच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आहे.

WTCच्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बांगलादेश चौथ्या क्रमांकावर असून पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

भारत सहाव्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज सातव्या स्थानावर आणि इंग्लंड आठव्या क्रमांकावर असून श्रीलंकेचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.

सामना जिंकल्यास संघाला १२ गुण दिले जातील. सामना बरोबरीत राहिल्यास ६ गुण मिळतील, सामना ड्रॉ झाल्यास ४ गुण आणि संघ पराभूत झाल्यास कोणतेही गुण मिळणार नाहीत. गुणांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, सामना जिंकल्यावर १०० गुण, टाय झाल्यावर ५०, ड्रॉ झाल्यास ३३.३३ आणि पराभव झाल्यावर कोणतेही गुण मिळणार नाहीत. गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संघ ठरवले जातील.

आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडिया आता ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये दौऱ्यातील शेवटचा सामना खेळणार आहे, त्यामुळे भारताची नजर मालिकेत बरोबरी साधण्यावर असेल.