ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका तिघांनाही संधी-
जर श्रीलंकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाने दोन पैकी एक जरी सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये जाईल. जर श्रीलंकेने ही मालिका १-० ने जिंकली, तर भारतीय संघ फायनलमध्ये जाईल. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तरीही ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये जाईल. पण श्रीलंकेने मालिका २-० ने जिंकल्यास श्रीलंका या दोन्ही संघांचा पत्ता कट करून स्वत: फायनलचे तिकीट मिळवेल.