Join us  

India Under-19, Yash Dhull:वडिलांनी नोकरी सोडून मुलाला क्रिकेट शिकवलं; आता करणार भारतीय संघाचे नेतृत्व, पाकिस्तानशी भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 1:12 PM

Open in App
1 / 9

2 / 9

आता अंडर १९ आशिया कप स्पर्धेसाठी सिलेक्टर्सनं दिल्लीचा खेळाडू यश ढुल याला भारताच्या अंडर १९ संघाचा कर्णधार म्हणून निवडलं आहे. तसंच वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी अंडर १९ स्पर्धेसाठीही त्याला कर्णधार केलं जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3 / 9

यश ढुल आणि त्याच्या कुटंबीयांनी दैनिक भास्करला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यानं आपला इथवरचा प्रवास उलगडला. आपल्या वडिलांचीही क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेट त्यांना क्रिकेट सोडून जॉब करावा लागला. त्यांचं स्वप्न ते माझ्यात पाहत आणि माझी प्रॅक्टिस प्रभावित होऊ नये, यासाठी त्यांनी आपला जॉबही बदलल्याचं तो म्हणाला.

4 / 9

'माझे वडील कॉस्मेटिकच्या कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांना अनेकदा प्रवास करावा लागत होता. म्हणूनच त्यांना प्रॅक्टिसवरही लक्ष देता येत नव्हतं, म्हणून त्यांनी आपली नोकरीही बदलली. त्यानंतर आमच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली होती,' असं यश म्हणाला.

5 / 9

वडिलांनी नोकरी बदलल्यानंतर अनेक खर्चात कपात केली. परंतु माझ्या आणि माझ्या बहिणीवर कोणताही प्रभाव पडू दिला नाही. त्या दरम्यान माझ्या आजोबांच्या पेन्शनच्या मदतीनं संपूर्ण घराचा खर्च चालत होता. ते लष्करातून निवृत्त झाले असल्याचंही त्यानं सांगितलं.

6 / 9

'ज्यावेळी माझे वडील कामावर जायचे तेव्हा माझं ट्रेनिंग आणि मॅचसाठी आजोबा मला घेऊन जायचे. ६ वर्षांचा असतानाच ते मला बाल भवन आणि एअर लाइनर क्रिकेट अॅकेडमीममध्ये घेऊन जात होते. जोवर ट्रेनिंग सुरू असायचं तोवर ते मैदानाबाहेर बसून राहायचे, असं यशनं सांगितलं.

7 / 9

अनेकदा मॅचला ते घेऊनही जात असतं आणि तेदेखील मॅच पाहत. काही वेळा माझी कामगिरी चांगली झाली नाही, तरीही ते माझं मनोबल वाढवत होते,' असं म्हणत त्यानं आपल्या आजोबांची आठवण सांगितली.

8 / 9

मी अन्य मुलांप्रमाणेच क्रिकेट खेळत होतो. कायम बॅट आणि बॉल सोबत असायचा. त्यावेळी माझ्या आईनं माझी आवड पाहून वडिलांना अॅकेडमीममध्ये दाखल करण्यास सांगितलं. क्रिकेटमध्ये असलेली माझी आवड पाहून घराच्या गच्चीवर मझी प्रॅक्टिस घेत होते, असंही यशनं सांगितलं.

9 / 9

आपल्याला मीडियम पेसर गोलंदाज बनायचं होतं, आपण गोलंदाजीही करत होते. परंतु एअर लायनर अॅकेडमीचे कोच प्रदीप कोचर यांनी आपल्याला फलंदाज बनवलं. त्यांनी मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच फलंदाजीच्या जोरावर मी मी अंडर १९ चा टीम इंडियाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचू शकलो, असंही त्यांनं नमूद केलं.

टॅग्स :भारतविराट कोहलीपृथ्वी शॉ
Open in App