कोरोना निमयामुळे दोन वेळा लग्न पुढे ढकलावे लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा अखेर बोहोल्यावर चढला. २१ जूनला त्यानं न्यू साऊथ वेल्स येथे प्रेयसी हॅट्टी हिच्यासोबत लग्न केलं.
भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली याच्यानंतर जर कोणाच्या लग्नाची चर्चा रंगली असेल तर ती जसप्रीत बुमराहच्या. २७ वर्षीय गोलंदाज बुमराहनं १५ मार्चमध्ये स्टोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेसनसोबत विवाह केला.
भारताचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकटनं २ फेब्रुवारीला गुजरातमध्ये रिन्नीसोबत लग्न केलं.
भारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादव हाही प्रेयसी दिशा चावला हिच्यासोबत १६ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकला.
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटिया यानंही २९ नोव्हेंबरला रिधी पन्नूसोबत लग्न केलं. त्यानं याच वर्षी फेब्रुवारीत साखरपुडा केला होता.
पुद्दुचेरी संघाचा कर्णधा रोहित दामोदरन यानंही २७ जूनला एश्वर्यासोबत लग्न केलं. त्याची पत्नी ही सिने निर्माचे एस शंकर यांची कन्या आहे.
अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यानं धर्माच्या भींती तोडून १६ जुलैला अंजून खान हिच्याही लग्न केलं.
भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानंही जानेवारीत वैशाली विश्वेश्वरन हिच्याशी विवाह केला.