Year Ender 2024 : बॉक्सिंग डे 'टेस्ट'सह हे वर्ष बुमराहसाठी ठरलं 'बेस्ट'

टेस्टमध्ये 'बेस्ट' कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं गाजवलं वर्ष

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ वर्षातील अखेरचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमरानं विशेष छाप सोडली.

याआधी मेलबर्नच्या मैदानात बुमराहनं यापेक्षा भारी कामगिरी नोंदवली होती. या मैदानात ३३ धावा खर्च करून ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

बॉक्सिंग डे कसोटीत 'पंजा' मारत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत त्याने सर्वाधिक ३० विकेट्सच्या रेकॉर्ड्सह यंदाचं वर्ष खास केलं. अशी कामगिरी करणारा तो आघाडीचा जलदगती गोलंदाज ठरला.

अखेरच्या सामन्यात त्याच्यासमोर भज्जीचा रेकॉर्ड मोडल्याचीही संधी असेल. भज्जीच्या नावे बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील एका मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट्सचा रेकॉर्ड आहे.

२०२४ मध्ये जसप्रीत बुमरानं १३ कसोटी सामन्यात ७१ विकेट्स घेतल्या आहेत.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बुमराहनं दुसऱ्यांदा पंजा मारला. मेलबर्न कसोटी सामन्यातील चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहनं ५७ धावा खर्च करून ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर खल्लास केला.

मेलबर्न ग्राउंडवर खेळलेल्या ७ सामन्यात बुमराहनं १४.६६ च्या सरासरीसह २.६८ इकोनॉमीसह त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत.

२०२४ मध्ये जसप्रीत बुमरानं १३ कसोटी सामन्यात ७१ विकेट्स घेतल्या आहेत.

एका वर्षात टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सरासरीच्या बाबतीत बुमराह तिसऱ्या तर स्ट्राइक रेटच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी राहिला.

जसप्रीत बुमराहनं कसोटीत २०० विकेट्सचा पल्ला गाठतही नवा इतिहास रचला. २० पेक्षा कमी सरासरीसह हा पल्ला गाठणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

८४८४ चेंडूत २०० विकेट्स घेत भारताकडून सर्वात जलद विकेट्सच 'द्विशतक' पूर्ण करण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला आहे.