नॅशनल क्रशचा टॅग लागलेली भारताची स्टार बॅटर स्मृती मानधनासाठी यंदाचं वर्ष एकदम खास राहि., खासकरून तिने टी-२० क्रिकेटमध्ये एका मागून एक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले
२८ वर्षीय डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारी स्मृती मानधनानं यावर्षी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा पार केला. सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारी ती सहावी बॅठर ठरली.
एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीतीही स्मृतीनं अव्वलस्थान पटकावले. २०२४ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ७६३ धावा ठोकल्या. तिच्यापाठोपाठ या यादीत चामरी अट्टापट्टू (७२० धावा) आणि युएईची इशा ओझा (७११ धावा) यांचा नंबर लागतो.
स्मृती मानधना हिने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्डही सेट केला आहे. १४२ डावात तिने ३० वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा विक्रम मोडित काढला.
आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही आता तिने आपल्या नावे केला आहे. तिने आतापर्यंत ६५०६ चौकार मारले आहेत. या यादीतही न्यूझी बेट्सला तिने बीट केले.
स्मृती मानधना ही महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL) आरसीबी संघाचे नेतृत्व करते. याच संघाकडून तिने या वर्षाची धमाकेदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.
जे पुरुष संघाला मागील १७ वर्षांत जमलं नाही ते RCB चं स्वप्न स्मृती मानधनानं याच वर्षी साकार केले.
तिच्या नेतृत्वाखालील RCB संघानं यंदाच्या वर्षातील WPL स्पर्धा जिंकली होती. तिच्या नेतृत्वाखालील हा क्षण प्रत्येक RCB चाहत्यासाठी एकदम खास आणि अविस्मरणीय ठरला.