अनेक क्रिकेटर्संनी मैदानातील दमदार कामगिरीच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या क्रिकेटर्सच्या मनात कोणत्या सुंदरीनं घरं केलंय, ही गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
क्रिकेटच्या मैदानातील लोकप्रिय खेळाडू अनेकदा फिल्डबाहेरील गोष्टीमुळेही चर्चेत असतात.
प्रेमाचा खेळ आणि क्रिकेटरनं आपल्या आयुष्याची इनिंग बहरण्यासाठी निवडलेला जोडीदार? याच्याबद्दलही त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते. इथं आपण एक नजर टाकुयात २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या स्टार क्रिकेटर्सबद्दलची खास स्टोरी
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडियात एन्ट्री मारणाऱ्या व्यंकटेश अय्यरनं गर्लफ्रेंड श्रुती रघुनाथन हिच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केली. आयपीएल २०२४ च्या हंगामात KKR चा संघ चॅम्पियन ठरला होता. या मेगा इवेंटनंतर हा क्रिकेटर लग्नबंधनात अडकला.
IPL स्टार आणि टीम इंडियाकडून खेळताना दिसलेला जलदगती गोलंदाज चेतन सकारिया यानेही याच वर्षी गर्लफ्रेंड मेघनासोबत आयुष्याची नवी इनिंग सुरु केली.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू प्रियांक पांचल याने IPL २०२४ च्या दरम्यान लग्न उरकल्याचे पाहायला मिळाले. त्याची पत्नी कालना शुक्ला ही स्पोट्स सायकॉलॉजिस्ट आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला प्रेरक मांकड हा देखील यंदाच्या वर्षी लग्न उरकणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत आहे. त्याने गर्लफ्रेंड किंजलसोबत लग्नगाठ बांधली.
अफगाणिस्तानच्या संघाला वर्ल्ड कप जिंकून दिल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हणणाऱ्या राशिद खान हा देखील यावर्षी लग्नबंधनात अडकला.