Year Ender 2024 : या ६ युवा क्रिकेटर्संसाठी वर्ष ठरलं 'एकदम झक्कास', कारण...

इथं एक नजर टाकुयात २०२४ या वर्षात कमालीची छाप सोडून टीम इंडियातील एन्ट्रीसह वर्ष अविस्मरणीय करणाऱ्या स्टार युवा क्रिकेटर्सवर

प्रत्येक क्रिकेटर टीम इंडियात संधी मिळावी, यासाठी जीव तोडून मेहनत घेत असतो. पण फार कमी खेळाडूंना ती संधी मिळते.

आता संधी मिळेल यश मिळतो असेही नसते. ज्यांना संधी मिळते त्यातील मोजकीच मंडळी पदार्पणात छाप सोडण्यात यशस्वी ठरतात.

इथं एक नजर टाकुयात २०२४ या वर्षात कमालीची छाप सोडून टीम इंडियातील एन्ट्रीसह वर्ष अविस्मरणीय करणाऱ्या स्टार युवा क्रिकेटर्सवर

२१ वर्षीय नितीश कुमार रेड्डी या अष्टपैलू खेळाडूनंही यंदाच्या वर्षी विशेष छाप सोडली. हार्दिक पांड्याच्या परफेक्ट रिप्लेसमेंटच्या रुपात त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने मिळालेल्या संधीच सोनंही करून दाखवलंय.

IPL मध्ये स्फोटक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्मासाठी यंदाच वर्ष एकदम खास राहिलं. SRH कडून २०२४ हंगामात सर्वाधिक ४२ षटकार ठोकून लक्षवेधून घेणाऱ्या २४ वर्षीय खेळाडूला या टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाली. मोठी फटकेबाजी करण्यात रिस्क असली तरी अगदी त्याच तोऱ्यात खेळून "रिस्क है तौ इश्क है' हे गाणं म्हणत त्याने टीम इंडियातही एन्ट्री मारली. पदार्पणाच्या सामन्यात पदरी भोपळा आल्यावर त्याने दमदार शतक झळकावून टी-२० संघातील आपली जागा फिक्स केली.

मयंक यादवनं आयपीएलमध्ये आपल्या भेदक माऱ्यानं प्रतिस्पर्धी संघाला गार करण्याची क्षमता दाखवली. लखनौ सुपर जाएंट्सकडून खेळताना तब्बल १५० Kmph पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत या गोलंदाजानं टीम इंडियात वर्णी लागली.

IPL मधून मिळालेल्या आणखी एका स्टारमध्ये रियान परागचा समावेश आहे. २३ वर्षीय अष्टैपलू खेळाडूनं याच वर्षी झिम्बाब्वे दौऱ्यातून टीम इंडियात एन्ट्री मारली. IPL २०२४ च्या हंगामात ३३ षटकारासह ५७३ धावा कुटल्यामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली.