Join us  

कालचे प्रेक्षक आज पुन्हा येणार? आयपीएल फायनलसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 9:10 AM

Open in App
1 / 10

यंदाची आयपीएल फारच रंगात आली होती. अनेक जणांनी शतकांवर शतके झळकवली होती. धावांचा नुसता पाऊस पडत होता, असे असताना खऱ्या पावसाने देखील अखेरच्या क्षणी हजेरी लावत चेन्नई सुपरकिंग आणि गुजरात टायटन्स यांच्याचील अंतिम सामन्यावर पाणी फिरविले.

2 / 10

फायनलच्या बाबतीत असे फारच विरळ घडते. आता आयपीएलने वाट पाहून हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घेण्याचे ठरविले आहे. असे असताना काल जे प्रेक्षक लाभले होते, ते आज पुन्हा येणार का असा यक्षप्रश्न आयपीएल आयोजकांसमोर उभा ठाकला आहे.

3 / 10

काल रविवार, सुट्टीचा वार असल्याने याच दिवशी फायनल ठेवण्यात आली होती. यामुळे या सामन्याला प्रेक्षकवर्गही दणकून मिळाला होता. आयपीएलमध्ये बलाढ्य संघांचे सामने हे शनिवार, रविवार पाहूनच ठेवण्यात आले होते. यामुळे गुजरातला सामना असला तरी आजुबाजुच्या शहरांतून, राज्यांतून अनेकजण सामना पाहण्यासाठी आले होते.

4 / 10

फायनल पाहण्यासाठी रविवारी दुपारी २-३ वाजल्यापासूनच प्रेक्षक येण्यास सुरुवात झाली होती. हे प्रेक्षक पाऊस थांबण्याची वाट पाहत मध्यरात्रीपर्यंत थांबून होते. महत्वाची बाब म्हणजे हजार ते दोन-तीन हजाराचे तिकीट काढून क्रिकेट प्रेमी आले होते. हौसेला मोल नसते म्हणून यायचा-जायचा खर्च, हॉटेलमध्ये रहायचा खर्च आदी देखील केलाच होता.

5 / 10

स्टेडिअममध्ये तुम्हाला सोबत खाण्या-पिण्याच्या वस्तू नेता येत नाहीत. म्हणजेच तुम्हाला स्टेडिअमममध्ये अव्वाच्या सव्वा दराने पाणी, कोल्डड्रिंक आणि नाश्ता आणि जेवण आदी घ्यावे लागते. तहाण-भूक लागल्यावर तुम्ही काय करणार, हा देखील या स्टेडिअम, आयोजकांचा उत्पन्नाचाच भाग असतो. यामुळे तिथले महागडे दर असतात, त्याचा फटका क्रिकेटप्रेमींना बसतो.

6 / 10

स्टेडिअममध्ये पाण्याचा एक ग्लास ३० ते ५० रुपयांना मिळतो. यावरून नाश्ता किंवा हलक्या आहाराचा दर काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. त्यातच काल सुट्टी असल्याने हे क्रिकेटप्रेमी आले होते. यातील बहुतांश जण हे नोकरदार वर्गातील. यामुळे रविवारी मॅच पाहिली की दुसऱ्या दिवशी कामावर जायचे नियोजन करून आले होते.

7 / 10

पावसामुळे या सर्वांच्या खर्चावर पाणी फेरले गेले आहे. ज्यांना शक्य असेल ते आजही आजुबाजुच्या हॉटेलमध्ये थांबतील, परंतू ज्यांची पहाटेची आपापल्या शहरात परतायची विमानाची, रेल्वेची तिकिटे असतील त्यांना मात्र निघावेच लागणार आहे. यामुळे कालचा प्रेक्षकवर्ग आज मिळेल का असा प्रश्न आयोजकांना पडला आहे.

8 / 10

त्यातच आजही आयपीएलच्या सामन्याच्या दिवशी पावसाचे सावट असल्याचा अंदाज आहे. Accuweather नुसार अहमदाबादमध्ये संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान पावसाची शक्यता 50 टक्के असेल. तर 7 वाजेनंतर रात्रभर पावसाची शक्‍यता शून्य टक्के वर्तवली जात आहे. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरु होईल. गुजरातमध्ये हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे.

9 / 10

आयपीएलने चाहत्यांना तिकीट सांभाळून ठेवण्याचं आवाहन केले आहे. सोमवारच्या दिवशी पुढे ढकललेल्या सामना स्टेडिअममध्ये येऊन पहायचा असेल तर फिजिकल तिकिटे सांभाळूनच या क्रिकेटप्रेमींना माघारी जावे लागले आहे.

10 / 10

आजच्या दिवशीदेखील पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला तर मेरिटनुसार निकाल जाहीक केला जाणार आहे. यानुसार साखळी फेरीतील टॉपर गुजरात टायटन्सला विजयी घोषित केले

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App