Join us

Yuvraj Singhनं 2011च्या वर्ल्ड कप फायनलसाठी बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीला दिलेलं स्पेशल तिकीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:24 IST

Open in App
1 / 10

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचं नाव अनेकदा बॉलिवूडच्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

2 / 10

युवीला 'ओम शांती ओम' फेम दीपिका पादुकोण आवडायची, म्हणून महेंद्रसिंग धोनीनं आपल्या प्रेमाचा त्याग केला, अशाही चर्चा रंगल्या.

3 / 10

दीपिकासह युवीचं आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं होतं आणि तिला युवीनं 2011च्या वर्ल्ड कप फायनलचं स्पेशल तिकीटही दिलं होतं.

4 / 10

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार अन् संपूर्ण देशात झालेला जल्लोष, आजही तसाच डोळ्यासमोर उभा आहे. 28 वर्षांनंतर भारतीय संघानं वन डे वर्ल्ड कप जिंकला.

5 / 10

यावेळी वानखेडे स्टेडियमवर बॉ़लिवूडची हॉट अभिनेत्री उपस्थित होती आणि ती केवळ युवीच्या आग्रहाखातर फायनल पाहायला आली होती.

6 / 10

कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणाऱ्या अमिषा पटेलसाठी युवीनं खास तिकीट पाठवलं होतं.

7 / 10

2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान या दोघांची मैत्री झाली आणि तेव्हा त्यांच्या अफेअर्सचीही चर्चा सुरू झाली.

8 / 10

NDTVच्या वृ़त्तानुसार युवीनं अमिषाला वर्ल्ड कप फायनलचं स्पेशल तिकीट दिलं होतं आणि अमिषानंही त्याला दुजोरा दिला होता.

9 / 10

''सैफ अली खान आणि रनबीर कपूर यांच्यासोबत एकाच व्हीआयपी बॉक्समध्ये बसून मॅच पाहत होते. तेव्हा मी युवीच्या नावानं खुप जल्लोष करत होती आणि बॉक्समधील अन्य लोकं मला गप्प राहण्यास सांगत होती,'' असं अमिषानं सांगितलं.

10 / 10

युवी आणि अमिषाच्या अफेअर्सच्या केवळ चर्चाच रंगल्या. युवीनं हेझल कीचसोबत लग्न केलं...

टॅग्स :युवराज सिंगदीपिका पादुकोणअमिषा पटेल