पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे. नुकतंच त्यानं पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केलं होतं.
त्याच्यावर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी जोरदार टीका केली.
युवी आणि भज्जीनं आफ्रिदीच्या समाजकार्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.
आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युवराज आणि हरभजन यांनी पाकिस्तानी खेळाडूशी मैत्री तोडली.
युवी आणि भज्जीच्या या पवित्र्यानंतर आफ्रिदीनं पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे.
तो म्हणाला,''भज्जी आणि युवी यांनी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं होतं, त्यांचा मी आजही आभारी आहे. पण, आता माझ्याशी मैत्री तोडण्यासाठी ते मजबूर होते.''
''ते ज्या देशात राहतात, तेथे असंच केलं जातं. वो मजबूर है. त्यांनी तसे केले नसते तर त्या देशातील लोकांनी त्यांचा छळ केला असता. मला यापुढे काही म्हणायचे नाही,''असे वादग्रस्त विधान आफ्रिदीनं केलं.