भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ही जोडी सध्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे.
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे कपल विभक्त होणार असल्याचे किस्से चवीचवीने वाचले जात आहेत.
युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनीही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या गोष्टी चर्चेत आहेत. दोघांनी याबाबत अनेक हिंट दिल्यात.
अनेक चर्चा होऊनही युजवेंद्र किंवा धनश्री कुणीही यावर अधिकृत वक्तव्य केलेले नाही. याचदरम्यान युजवेंद्र चहलच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही ताजे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने अतिशय सूचक असे कॅप्शनही दिले आहे.
खरं प्रेम काय असतं, याबाबत चहल बोलला आहे. खरं प्रेम हे खूप 'दुर्मिळ' असतं आणि मी तो 'दुर्मिळ' व्यक्ती आहे, असे त्याने लिहिले आहे.
चहलने पोस्ट केलेल्या फोटोंवर आणि कॅप्शनवर त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहेत आणि त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत.