Dhanashree Verma: युझवेंद्र चहलच्या पत्नीने शेअर केले हॉट बाथरूम सेल्फी, फॅन्सना विचारलं असं काही...

Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma: टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. धनश्री तिचे डान्सचे व्हिडीओ तसेत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता धनश्रीने असाच जबरदस्त फोटो शेअर केला आहे.

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. धनश्री तिचे डान्सचे व्हिडीओ तसेत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता धनश्रीने असाच जबरदस्त फोटो शेअर केला आहे.

धनश्री वर्मा हिने बाथरूम सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. धनश्रीने या फोटोखाली कॅप्शन देत फॅन्सना प्रश्नही विचारला आहे. बाथरूम सेल्फी अजून काही आहे का? खूप वेळ झालाय, असं तिने यात म्हटलं आहे.

धनश्री वर्माच्या या फोटोवर फॅन्स फिदा झाले आहेत. तसेच कमेंटमध्ये ब्युटिफूल, क्यूट यासारख्या कमेंट्स फॅन्सकडून करण्यात येत आहेत.

भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना धनश्री वर्मा युझवेंद्र चहलसोबत इंग्लंडमध्ये पोहोचली होती. तिने इंग्लंड दौऱ्यातील अनेक फोटो इंस्टाग्रावमवर शेअर केले होते.

२५ वर्षांची धनश्री कोरियोग्राफर आहेत. तिचे अनेक डान्स व्हिडीओ व्हारयल होत असतात. तसेच युझवेंद्र चहलनेही तिच्यासोबत अनेक डान्स व्हिडीओ तयार केले आहेत.

धनश्रीने हल्लीच लेटेस्ट ट्रेंडवर एक डान्स व्हिडीओ तयार केला होता. त्यावर पाच मिलीयनपेक्षा अधिक व्ह्यूज आले होते. धनश्रीच्या अनेक व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळत असतात.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी डिसेंबर २०२० मध्ये विवाह केला होता. धनश्री आयपीएल सामन्यांदरम्यान नेहमीच हजेरी लावले. तसेच पती युझवेंद्र चहल याला पाठिंबा देत असते.

इंग्लंड दौऱ्यातील धनश्रीचा एक सुंदर फोटो.