Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2018ः नऊ खेळाडूंच्या नाकी नऊ; दुखापतीमुळे आयपीएलमधून 'आऊट'IPL 2018ः नऊ खेळाडूंच्या नाकी नऊ; दुखापतीमुळे आयपीएलमधून 'आऊट' By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 2:12 PMOpen in App1 / 9आयपीएल 11च्या पर्वाला 7 एप्रिलपासून सुरुवात झाली. सर्वच संघ आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी कसोशीनं खेळतायत. परंतु या आयपीएलच्या पर्वात 9 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कोल्टर नाइलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं खरेदी केलं होतं. नाथनला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं. 2 / 9ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पेट कमिन्सलाही मुंबई इंडियन्सनं 5.4 कोटी रुपयांना विकत घेतलं. परंतु कमिन्सला आघात झाल्यानं तो गोलंदाजी करू शकत नाही. 3 / 9कसिगो रबाडाला दिल्ली डेअरडेविल्सनं 4.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. पण दुखापतीमुळे अद्यापही तो दिल्लीकडून मॅच खेळू शकलेला नाही. 4 / 9ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कलाही कोलकाता नाइट रायडर्सनं खरेदी केलं. परंतु शारीरिक अस्वास्थ्यामुळे तो संघाला वेळ देऊ शकला नाही. 5 / 9चेन्नई सुपरकिंग्जनंही केदार जाधवला 7.8 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मात्र जाधवला जखम झाल्यानं सामन्यातून बाहेर पडावं लागलं. 6 / 9मिचेल सेंटनर आयपीएल 11च्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्जचा भाग आहेत. दुखापतीमुळे तो सामन्याच्या बाहेर आहे. 7 / 9जेसन बेहरेनडोर्फ दुखापतीमुळे आयपीएल 11च्या पर्वातून बाहेर आहे, मुंबई इंडियन्सनं त्यांना 1.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. 8 / 9कमलेश नागरकोटीही कोलकाता नाइट रायडर्सकडून तीन सामने खेळला. परंतु दुखापतीमुळे तो सध्या बाहेर आहे. 9 / 9अफगाणिस्तानचा स्पिनर जहीर खानही आयपीएल 11च्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. त्यानं टीमसाठी फक्त एकच सामना खेळलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications