PHOTOS : Team India ची 'सहल'! झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची भटकंती

भारतीय शिलेदारांची झिम्बाब्वेत भटकंती.

शुबमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली.

तर दुसऱ्या सामन्यात १०० धावांनी विजय मिळवून भारताच्या युवा सेनेने मालिकेत बरोबरी साधली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) झिम्बाब्वे क्रिकेट आणि झिम्बाब्वे पर्यटन या हेतूने हरारे येथे भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वन्यजीव सहलीचे आयोजन केले होते. याची झलक बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

फोटोंमध्ये विविध वन्यजीव पाहायला मिळत आहे. हत्ती, उंट, हरिण, सरडा आणि रानगेंडा हे वन्यजीव अभयारण्याचे सौंदर्य वाढवत असल्याचे दिसते.

दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या या खेळीत ८ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात अभिषेकने चमक दाखवली. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेला अभिषेक दुसऱ्या सामन्यात लयमध्ये दिसला.

यासह युवा अभिषेक शर्माने भारतीय कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली. रोहितनेदेखील झिम्बाब्वेविरूद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.

खरे तर विश्वचषक जिंकताच रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. याचाच दाखला देत चाहत्यांनी अभिषेकचे कौतुक करताना 'एक शर्मा गेला तर दुसरा शर्मा आला', असे उद्गार काढले.