Prithvi Shaw : पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

Prithvi Shaw Vijay Hazare Trophy Semi-Final against Karnataka मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यानं ( Mumbai Captain Prithvi Shaw) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत आणखी एक धडाकेबाज खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:25 PM2021-03-11T12:25:50+5:302021-03-11T12:27:55+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw becomes the highest run-scorer in a single edition of Vijay Hazare Trophy, 165 runs in the Semi-Final against Karnataka | Prithvi Shaw : पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

Prithvi Shaw : पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यानं ( Mumbai Captain Prithvi Shaw) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत आणखी एक धडाकेबाज खेळी केली. त्यानं उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. विजय हजारे चषक स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आज त्यानं नावावर केला. त्यानं मयांक अग्रवालचा ( ७२३ धावा, २०१८) विक्रम मोडला. पृथ्वीनं १२२ चेंडूंत १७ चौकार व ७ षटकारांच्या मदतीनं १६५ धावांची वादळी खेळी केली. यंदाच्या मोसमात पृथ्वीनं तिसऱ्यांदा १५०+ धावांची खेळी केली. पृथ्वीनं फक्त चौकार षटकारांनी २४ चेंडूंत ११० धावांचा पाऊस पाडला. पृथ्वी बाद झाला तेव्हा मुंबईनं ४१ षटकांत ४ बाद २४७ धावा केल्य होत्या.  इस्लाम स्वीकारलं म्हणून फलंदाजीत सुधारणा झाली, भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले; पाकिस्तानी खेळाडूचं विधान 

प्रथम फलंदाजी करताना मुंबईला यशस्वी जैस्वाल ( ६) च्या रुपानं धक्का बसला. पण, पृथ्वी फॉर्मात दिसला. त्यानं ७९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्यानं यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या देवदत्त पडीक्कल ( ६७३ धावा) यालाही मागे टाकले.  आदित्य तरे १६ धावा करून माघारी परतल्यानंतर पृथ्वीनं तिसऱ्या विकेटसाठी एस मुलानीसह मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावा जोडल्या. मुलानी ७१ चेंडूंत ४५ धावा करून माघारी परतला. त्यापाठोपाठ पृथ्वीही तंबूत परतला.  IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ( Most runs in a season of Vijay Hazare Trophy )
७५४* - पृथ्वी शॉ, २०२१
७२३ - मयांक अग्रवाल, २०१८
६७२ - देवदत्त पडीक्कल, २०२१ ( आतापर्यंत)
६०९ - देवदत्त पडीक्कल, २०१९
६०७ - दिनेश कार्तिक, २०१७
६०५ - रविकुमार समर्थ, २०२१ ( आतापर्यंत) 

पृथ्वी शॉची यंदाच्या पर्वातील कामगिरी ( Prithvi Shaw in Vijay Hazare 2021)
१०५*( ८९) वि. दिल्ली 
३४ ( ३८) वि. महाराष्ट्र
२२७* ( १५२) वि. पुद्दुचेरी
३६ ( ३०) वि. राजस्थान
२ ( ५) वि. हिमाचल प्रदेश
१८५* ( १२३) वि. सौराष्ट्र ( उपांत्यपूर्व फेरी)
१६५ ( १२२) वि. कर्नाटक ( उपांत्य फेरी)  
७ सामन्यांत ७५४ धावा, १ द्विशतक व ३ शतकं. १८८.५ ची सरासरी व १३४.८८चा स्ट्राईक रेट
 

सौराष्ट्रविरुद्धची खेळी अन् मोडला धोनी व विराटचा विक्रम 
पृथ्वीच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो. 

Web Title: Prithvi Shaw becomes the highest run-scorer in a single edition of Vijay Hazare Trophy, 165 runs in the Semi-Final against Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.