विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...

भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 08:31 PM2024-06-30T20:31:29+5:302024-06-30T20:32:27+5:30

whatsapp join usJoin us
Prize Money of 125 Crores for Team India: BCCI to pay Rs 125 crore, Jai Shah's announcement | विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...

विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Prize Money of 125 Crores for Team India: तब्बल तेरा वर्षांनंतर T-20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघावर पैशांचा पाऊस पाडला आहे. आता भारतीय संघाला तब्बल 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भारतीय संघाचे T-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचेही अभिनंदन केले. तसेच भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. 

जय शाह काय म्हणाले?
जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत आहे. या अद्भुत कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन.

टीम इंडियाची चौथी आयसीसी ट्रॉफी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चौथ्यांदा विश्वचषक (ODI, T20) जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी (29 जून) T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारताने यापूर्वी दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तर, 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. 

Web Title: Prize Money of 125 Crores for Team India: BCCI to pay Rs 125 crore, Jai Shah's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.