IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

एक नजर टाकुयात ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर ज्यांच्यासाठी फ्रँचायझी पर्समधून अगदी सहज काढतील मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:38 PM2024-11-19T12:38:56+5:302024-11-19T12:40:14+5:30

whatsapp join usJoin us
R Ashiwin Venkatesh Iyer And Washington Sundar This Three All Rounders Can Get Big Amount IPL 2025 Mega Auction | IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

3 Indian All Tounders May Be Get Big Amount In IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावात फ्रँचायझी संघ तगड्या भिडूंसह तगडी टीम तयार करण्यासाठी रिंगणात उतरतील. सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात २४ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन दिवसांत अनेक खेळाडू कोट्याधीश झाल्याचे पाहायला मिळेल. एक नजर टाकुयात ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर ज्यांच्यासाठी फ्रँचायझी संघ आपल्या पर्समधून मोठी रक्कम काढायला अगदी सहज तयार होतील. 

या तिघांवर अनेक फ्रँचायझी संघाच्या असतील नजरा

आयपीएलमध्ये एक काळ असा होता, ज्यावेळी मिनी किंवा मेगा लिलावात विदेशातील अष्टपैलू खेळाडूंचा दबदबा दिसायचा. पण आता चित्र बदलताना दिसते आहे. भारतीय खेळाडू क्रिकेटच्या मैदानात हिंमत दाखवून  आपली किंमत वाढवणारी कामगिरी करून दाखवत आहेत. त्यामुळे अष्टपैलूंच्या खेळाडूंना ताफ्यात घेण्यासाठी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंसाठी चढाओढा पाहायला मिळाली तर नवल वाटू नये. 
 
आर अश्विन


भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू आर अश्विन हा एक परफेक्ट ऑल राउंडर आहे. गोलंदाजीमध्ये तो हुकमी  एक्का आहेच. पण वेळ प्रसंगी आपल्या फटकेबाजीनं सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे. तमिळनाडू प्रिमियर लीगमध्ये अश्विननं आपल्या बॅटिंगची कमाल दाखवून दिली आहे. त्यामुळे मेगा लिलावात त्याला संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझीमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते. त्याच्यासाठी अनेक फ्रँचायझी संघ मोठी किंमत मोजायला तयार असतील. 

वॉशिंग्टन सुंदर


टीम इंडियातील युवा ऑल राउंडर वॉशिंग्टन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अति सुंदर कमबॅक करून दाखवले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली अन् त्याने आपल्यातील क्षमताही सिद्ध केली. या युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तगडी बिटिंग होऊ शकते. 

 व्यंकटेश अय्यर


आयपीएलमधील अल्प करिअरमध्ये धमाकेदार कामगिरीसह टीम इंडियात एन्ट्री मारणाऱ्या व्यंकटेश अय्यरवरही अनेक फ्रँचायझी संघाच्या नजरा असतील.  व्यंकटेश अय्यर मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी बहुमूल्य कामगिरी करताना दिसला होता. पण केकेआरनं त्याला रिटेन केलेल नाही. केकेआर पुन्हा त्याच्यासाठी मोठा डाव खेळणार की, अन्य फ्रँचायझी डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल.  

Web Title: R Ashiwin Venkatesh Iyer And Washington Sundar This Three All Rounders Can Get Big Amount IPL 2025 Mega Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.