राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यापासून ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या समर्थनात ट्विट केलं आहे. पण, सचिननं केलेलं ट्विटवर समिंश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सचिनच्या #IndiaAgainstPropoganda ट्विटनंतर सोशल मीडियावर माजी कसोटीपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) ट्रेंड होऊ लागला आहे. Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. या सर्वांना उत्तर म्हणून देशातील अनेक सेलिब्रेटिंनी ट्विट केले. सोशल मीडियावर जणू ट्विटरवॉर सुरू झाला आहे. ''भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया,'' असं आवाहन सचिन तेंडुलकरने ट्विटमधून केले आहे.
सचिनचे हे ट्विट ८८ हजारांहून अधिकांनी रिट्विट केलं, तर २ लाखहून अधिकांनी लाईक्स केले आणि ४१ हजार कमेंट्स त्यावर आल्या. पण, बरीच लोकं सचिनच्या या ट्विटवर नाखूश दिसली. तेंडुलकरच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर राहुल द्रविड ट्रेंड होऊ लागला. राहुल द्रविड हा कोणत्याच सोशल मीडियावर नाही. एका नेटिझन्सचं ट्विट तुफान व्हायरल झालं. त्यानं २००४च्या मुलतान कसोटीचा संदर्भ देताना, ''राहुल द्रविडनं त्या दिवशी तुला माघारी बोलवलं हेच योग्य केलं.''असं लिहिलं होतं. २००४च्या त्या कसोटीत १९४ धावांवर खेळत असताना राहुल द्रविडनं भारताचा डाव घोषित केला. त्याच्या या निर्णयावर त्यावेळी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तेंडुलकरही त्या निर्णयावर नाराज होता.
'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलंमहेंद्रसिंग धोनीनं एक चकार वाक्यही काढले नाही, तरीही तोही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Web Title: Rahul Dravid trends for THIS reason after sachin Tendulkar's tweet on #IndiaAgainstPropoganda
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.