बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक

बॉलिवूड चित्रपट निर्मात्याच्या लेकाचा रणजी ट्रॉफी स्पर्धेत बॅक टू बॅक हिट शो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:19 PM2024-10-28T17:19:02+5:302024-10-28T17:23:05+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy 2024-25 After Surpassing Sir Don Bradman Record Agni Chopra Hit Back To Back 2nd Double Century | बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक

बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy 2024-25, Agni Chopra Hit Back To Back 2nd Double Century :  मिझोरामचा स्टार फलंदाज अग्नी चोप्रा रणजी करंडक स्पर्धेत धुमाकूळ घालताना दिसत आहे. अग्नीनं सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा आणि फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्रा यांच्या लेकानं मणिपूर विरुद्धच्या सामन्यात २६९ चेंडूत २१८ धावांची दमदार खेळी केली. मागील तीन सामन्यातील ही त्याची तिसरी १०० + इनिंग ठरली.

याआधी अहमदाबादच्या मैदानात झळकावलं होतं द्विशतक

रणजी करंडक स्पर्धेतील  या आधीच्या  सामन्यात अग्री चोप्रा यानं अरुणाचल प्रदेश विरुद्ध अहमदाबादच्या मैदानात ११० धावा आणि  २३८ धावा अशी कामगिरी करुन दाखवली होती. मिझोरामच्या संघाने हा सामना २६७ धावांनी जिंकला होता. अग्नी चोप्रा यानं अंडर १९ आणि अंडर २३ स्तरावरील क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधीत्वही केले आहे. कोच खुसफ्रीत यांच्या सल्ल्यानुसार, त्याने मिझोरामकडून खेळायला सुरुवात केली. 

क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला जमलं नाही ते अग्नीनं करून दाखवलं

मिझोराम संघाकडून खेळताना फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने अगदी धमाक्यात एन्ट्री मारली. पहिल्या चार रणजी सामन्यात त्याने १०५, १०१, ११४, १०, १६४, १५, १६६ आणि ९२ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. यासह अग्रीनं पहिल्या चार प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन' अर्थात सर डॉन ब्रॅडमन यांनी जी गोष्ट जमली नव्हती ते त्याने करून दाखवलं आहे. त्यानंतर आता सलग दुसऱ्या द्विशतकासह त्यानं आणखी एक नवा पराक्रम करून दाखवला आहे.

अग्नी चोप्राची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यातील १७ डावात त्याने १५८५ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात ८ वेळा त्याने १००+ धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करत तो आपलं नाणं खणखणीत असल्याचे दाखवून देतोय. एवढेच नाही तर आपल्या संघासाठी तो विजय मिळवण्याचा मार्ग अगदी सोपा करून ठेवताना दिसून येते. 

Web Title: Ranji Trophy 2024-25 After Surpassing Sir Don Bradman Record Agni Chopra Hit Back To Back 2nd Double Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.