तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमध्ये राशिद खानची बक्कळ प्रॉपर्टी; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

अफगाणिस्तानवर सध्या तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. एक एक शहर घेत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान मुठीत घेतलं अन् सत्तास्थापनेचा दावा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:55 PM2021-08-25T17:55:48+5:302021-08-25T18:08:36+5:30

whatsapp join usJoin us
Rashid Khan Net Worth, Wife, Lifestyles: All You Need About famous Afghan cricket player | तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमध्ये राशिद खानची बक्कळ प्रॉपर्टी; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमध्ये राशिद खानची बक्कळ प्रॉपर्टी; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अफगाणिस्तानवर सध्या तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. एक एक शहर घेत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान मुठीत घेतलं अन् सत्तास्थापनेचा दावा केला. अफगाणिस्तानातून जीव वाचवत अनेक जणं आहे त्या परिस्थितीत आहे त्या कपड्यांमध्ये पळताना दिसत आहेत. पण, तालिबानी अफगाणिस्तान क्रिकेटला धोका पोहोचवणार नाही, असा दावा क्रिकेट बोर्डाकडून केला जात आहे. तरीही देशात अडकलेल्या कुटुंबीयांची खेळाडूंना चिंता सतावत आहे. स्टार फिरकीपटू राशिद खान यानं सोशल मीडियावरून त्याची ही चिंता व्यक्त केली.

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद हा जगभरातील ट्वेंटी-२० लीगमधील स्टार गोलंदाज आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी जेवढी लोकप्रियता नाही, तेवढी राशिद खानची आहे. सध्या तो लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दी हंड्रेड लीगमध्येही त्यानं चांगली कामगिरी केली अन् आता तो इंडियन प्रीमिअर लीगसाठी सज्ज होत आहे.  

२०१५ सालानंतर ट्वेंटी-२० राशिद हे खूप मोठे नाव झाले आहे. पण, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याला मिळणारे मानधन अन् आयपीएलमधून तो कमावणारी रक्कम यात जमीनआसमानचा फरक आहे. अफगाणिस्तान बोर्ड त्याला वर्षाला ७२.८२ लाख देतात, तर सनराझर्स हैदराबादचा हा खेळाडू आयपीएलमधून ९.७ कोटी कमावतो.

२०१८मध्ये त्यानं आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली. सनरायझर्स हैदराबादनं त्याला ४ कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले. २०२१च्या लिलावात त्याच्यासाठी ९ कोटी मोजले गेले. तीन वर्षांत आयपीएलमध्ये झटपट आर्थिक प्रगती करणारा तो गोलंदाज ठरला.  


राशिद अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आला आणि बालपणी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, आयुष्यातील चढ-उतारानंतर राशिदनं अथक मेहनत घेताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले. 

एका रिपोर्टनुसार राशिदचं एकुण नेटवर्थ २२ कोटी इतके आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाव्यतिरिक्त तो अन्य लीगमधील फ्रँचायझींकडून बक्कळ पगार घेतो.  

Web Title: Rashid Khan Net Worth, Wife, Lifestyles: All You Need About famous Afghan cricket player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.