Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आता उरलेल्या तीन सामन्यांत आयपीएल २०२१च्या संघबांधणीच्या दृष्टीनं प्रयोग करताना दिसणार आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या आजच्या सामन्यात त्यांनी दोन बदल केले आहेत. मिचेल सँटनर आणि मोनू सिंग यांना अनुक्रमे जोश हेझलवूड व शार्दूल ठाकूर यांच्या जागी स्थान दिले आहे. RCBनेही संघात इसुरू उदानाच्या जागी मोईन अलीला संधी दिली आहे. आजच्या सामन्यात RCB ग्रीन रंगाच्या जर्सीत मैदानावर उतरले आहेत. २०११पासून IPLच्या प्रत्येक पर्वात एक सामना RCB ग्रीन जर्सीत खेळतो. पण, विराटचा संघ असे का करतो हे माहित्येय का?
RCB ग्रीन जर्सी घालतो कारण तो त्यांच्या 'Go Green' चळवळीचा भाग आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपण करणे, याचा प्रसार करण्यासाठी विराट कोहलीच्या संघाचा हा प्रयत्न आहे. जगाला सध्या ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे. आगामी काळात परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुनर्वापराचे महत्त्व पटवून देण्याचे काम RCBचा संघ करत आहे.
प्रदुषण रोखण्यासाठी Reduce, Recycle आणि Reuse हे तीन महत्त्वाचे मुद्दे RCB त्यांच्या चळवळीतून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. RCBची ही ग्रीन जर्सी ही प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार करण्यात आली आहे.
Web Title: RCB vs CSK Latest News : Why RCB wear green jersey once in every IPL season? All you need to know
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.