RCB vs DC Latest News : विराट कोहलीनं मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; रोहित शर्मानंतर पटकावले दुसरे स्थान

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं ...

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 10:56 PM2020-10-05T22:56:26+5:302020-10-05T22:57:19+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News : Most runs against an Opponent in IPL; Virat Kohli break David Warner record | RCB vs DC Latest News : विराट कोहलीनं मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; रोहित शर्मानंतर पटकावले दुसरे स्थान

RCB vs DC Latest News : विराट कोहलीनं मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; रोहित शर्मानंतर पटकावले दुसरे स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आक्रमक सुरुवातीनंतर दिल्लीला सलग तीन धक्के बसले, परंतु मार्कस स्टॉयनिस आणि रिषभ पंत यांनी RCBचा सर्व डावच उधळला. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना DCला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्र्त्युत्तरात निराशाजनक सुरुवातीनंतर विराट कोहलीनं RCBचा डाव सारवला अन् विक्रमाला गवसणी घातली. 

विराट कोहलीकडून मोठी चूक होणारच होती, पण तो वेळीच सावध झाला; पाहा व्हिडीओ

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वी शॉला ( 42 धावा) आणि शिखर धवन ( 32) बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी 89 धावांची भागीदारी करून RCBच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. स्टॉयनिसला नशीबानंही साथ दिली, युजवेंद्र चहलनं त्याचा झेल सोडला, तर विराट कोहलीनं त्याला धावबाद करण्याची संधी गमावली. रिषभ पंत 37 धावांवर ( 3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला ( 6 चौकार व 2 षटकार). दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या.  

प्रत्युत्तरात आरोन फिंचलाही ( Aaron Finch) कागिसो रबाडानं जीवदान दिले. पण, त्याला मोठी खेळी करता आली नाही. RCBचा इनफॉर्म फलंदाज देवदत्त पडीक्कलही आज स्वस्तात माघारी परतला. RCBचे दोन्ही सलामीवीर 27 धावांवर माघारी परतले. त्यानंतर विराटनं 10वी धाव घेताच विक्रमाला गवसणी घातली. ( विराट कोहलीची 'विश्व'विक्रमी कामगिरी; ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा पहिला भारतीय ) विराट आणि मोइन अली सामना DCच्या हातून काढतील असेच वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अपयश अलीचा IPLमध्येही पाठलाग सोडत नसल्याचे दिसले. तो 11 धावांवर बाद झाला. विराट कोहली धावा कुटत होत्या आणि त्याला रोखण्यासाठी कागिसो रबाडाला पाचारण करण्यात आले. DCचा हा डाव यशस्वी ठरला. 43 धावांवर विराटही बाद झाला. RCBनं तिथेच सामना गमावला. पण, विराटनं या खेळीसह डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला.

एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • रोहित शर्मा - 904 वि. कोलकाता नाइट रायडर्स
  • विराट कोहली - 868 वि. दिल्ली कॅपिटल्स
  • डेव्हिड वॉर्नर -  865 वि. कोलकाता नाइट रायडर्स
  • डेव्हिड वॉर्नर - 819 वि. किंग्स इलेव्हन पंजाब
  • सुरेश रैना - 818 वि. कोलकाता नाइट रायडर्स 
  • सुरेश रैना - 818 वि. मुंबई इंडियन्स

 

 

 

Web Title: RCB vs DC Latest News : Most runs against an Opponent in IPL; Virat Kohli break David Warner record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.