RCB vs DC Latest News : विराट कोहलीची 'विश्व'विक्रमी कामगिरी; ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा पहिला भारतीय

Indian Premier League ( IPL 2020) आज अव्वल स्थानासाठीची लढाई रंगत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात Dubai International Cricket Stadiumवर रंगणाऱ्या सामन्यात दोन्ही कर्णधारांचे लक्ष अव्वल स्थानाकडे असणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 09:59 PM2020-10-05T21:59:05+5:302020-10-05T22:06:35+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News : Virat Kohli becomes the first Indian to reach 9000 Runs in T20 history | RCB vs DC Latest News : विराट कोहलीची 'विश्व'विक्रमी कामगिरी; ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा पहिला भारतीय

RCB vs DC Latest News : विराट कोहलीची 'विश्व'विक्रमी कामगिरी; ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा पहिला भारतीय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज अव्वल स्थानासाठीची लढाई रंगत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात Dubai International Cricket Stadiumवर रंगणाऱ्या सामन्यात दोन्ही कर्णधारांचे लक्ष अव्वल स्थानाकडे असणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रविवारी सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) 34 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. प्रत्येकी चार सामने खेळलेले RCB आणि DC 6 गुणांसह मागोमाग आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो 8 गुणांसह अव्वल स्थानावर सरकेल.

आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते, ते विराट कोहलीच्या ( Virat Kohli) भीमपराक्रमाकडे. भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रम कोहलीच्या नावावर आज नोंदवला गेला. IPL मध्ये सर्वाधिक 5502 धावांचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. IPL मध्ये 5500 धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. विराटनं 10वी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरानं लिहिले गेले. सर्व प्रकारच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट 7व्या क्रमांकावर आहे. 

RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वी शॉला ( 42 धावा) आणि शिखर धवन ( 32) बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी 89 धावांची भागीदारी करून RCBच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. स्टॉयनिसला नशीबानंही साथ दिली, युजवेंद्र चहलनं त्याचा झेल सोडला, तर विराट कोहलीनं त्याला धावबाद करण्याची संधी गमावली. रिषभ पंत 37 धावांवर ( 3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला ( 6 चौकार व 2 षटकार). दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या.  

प्रत्युत्तरात आरोन फिंचलाही ( Aaron Finch) कागिसो रबाडानं जीवदान दिले. पण, त्याला मोठी खेळी करता आली नाही. RCBचा इनफॉर्म फलंदाज देवदत्त पडीक्कलही आज स्वस्तात माघारी परतला. RCBचे दोन्ही सलामीवीर 27 धावांवर माघारी परतले. त्यानंतर विराटनं 10वी धाव घेताच विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 285 ट्वेंटी-20 सामन्यांत 8990 धावा होत्या आणि 10 वी धाव करताच ट्वेंटी-20त 9 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. भारताचा रोहित शर्माच्या नावावर 8818 धावा आहेत, तर सुरेश रैनानं 8392 धावा केल्या आहेत.

ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत खिस गेल (१३,२९६ धावा), किएरॉन पोलार्ड (१०,२३८), ब्रेंडन मॅक्क्युलम (९,९२२),  शोएब मलिक (९,९०६), डेव्हिड वॉर्नर (९,३१८) आनि अ‍ॅरोन फिंच (९,०८८) हे विराटच्या पुढे आहेत. 

Web Title: RCB vs DC Latest News : Virat Kohli becomes the first Indian to reach 9000 Runs in T20 history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.