विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला.कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) त्यांची गाठ पडणार आहे. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) हे सलामीला आले. पदार्पणातच RCBच्या देवदत्त पडीक्कलनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण केलं. ( RCB vs SRH Live Score & Updates )
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. ( RCB vs SRH Live Score & Updates )
देवदत्तनं आजच्या खेळीसह एक वेगळा विक्रमही केला. प्रथम श्रेणी ( 77 धावा), लिस्ट ए ( 58 धावा) क्रिकेटमध्ये, ट्वेंटी-20 ( 53*) आणि IPL पदार्पणात त्यानं 56 धावा केल्या आहेत.
पदार्पणात 50+ धावा करणारे खेळाडू
102* धावा - ख्रिस गेल वि. किंग्स इलेव्हन पंजाब ( 2011)
54* धावा -
एबी डिव्हिलियर्स वि. कोची टस्कर केरळ ( 2011)
52* धावा - युवराज सिंग वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2014)
52 धावा - एक गोस्वामी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2008)
56 धावा - देवदत्त पडीक्कल वि.
सनरायझर्स हैदराबाद ( 2020)
क्रिकेटसाठी 11 वर्षांचा असताना हैदराबाद सोडून गाठलं कर्नाटक
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं 2019मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत 11 सामन्यांत 81.1 च्या स्ट्राईट रेटनं 609 धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश असून नाबाद 103 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 11 सामन्यांत 177.7च्या स्ट्राईक रेटनं 517 धावा चोपल्या. त्यात नाबाद 122 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यात पाच अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश आहे. ( RCB vs SRH Live Score & Updates )
Web Title: RCB vs SRH Latest News : Devdutt Padikkal score half century in his IPL debut, broke AB de Villiers record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.