विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला.कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) त्यांची गाठ पडणार आहे. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) हे सलामीला आले. पदार्पणातच RCBच्या देवदत्त पडीक्कलनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण केलं. कोण आहे हा देवदत्त? ( RCB vs SRH Live Score & Updates )
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
RCBनं IPL 2020च्या मोसमासाठी एबी डिव्हिलिअर्स, देवदत्त पडीक्कल, गुरुकीरत सिंह, मोइन अली, मुहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. 19 वर्षीय खेळाडूनं विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत देवदत्तनं सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये पदार्पण करताना त्यानं सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. ( RCB vs SRH Live Score & Updates )
RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं 2019मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत 11 सामन्यांत 81.1 च्या स्ट्राईट रेटनं 609 धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश असून नाबाद 103 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 11 सामन्यांत 177.7च्या स्ट्राईक रेटनं 517 धावा चोपल्या. त्यात नाबाद 122 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यात पाच अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश आहे. ( RCB vs SRH Live Score & Updates )
सनरायझर्स हैदराबादचा संघ ( Sunrisers Hyderabad Playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, प्रियांक गर्ग, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore Playing XI) - आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, उमेश यादव, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.
अन्य म्हत्त्वाच्या बातम्या
तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...
राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार
नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर
सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद
मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांनी बदललं स्वतःचं नाव, जाणून घ्या कारण
Web Title: RCB vs SRH Latest News : IPL Debut for Devdutt Padikkal, Open innings for RCB; Know all about him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.