Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील १८ ऑक्टोबरचा दिवस खऱ्या अर्थानं सुपर संडे ठरला. एकाच दिवशी तीन Super Overचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुपारच्या सत्रातील सामना सुपर ओव्हरमध्ये KKRनं जिंकला. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) आणि मुंबई इंडियन्सन ( MI) यांच्यात डबल सुपर ओव्हर झाली. Kings XI Punjabनं हा सामना जिंकला. या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या Mystery Girlनं सर्वांचे लक्ष वेधले.
कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्लॅमरस चेहऱ्यांना यंदा चाहते मिस करत असतील. पण, मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात कॅमेरामननं या मुलीकडे कॅमेरा फिरवला अन् तिच्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
रियाना लालवानी असं या Mystery Girlचं नाव असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या ६ बाद १७६ धावांच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हन पंजाबलाही ५ बाद१७६ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर Super Overमध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला जसप्रीत बुमराहनं ५ धावांवर रोखलं. पण, मोहम्मद शमीनंही टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला ५ धावा करू दिल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. ख्रिस जॉर्डननं दोन वाइड बॉल टाकून मुंबईच्या धावसंख्येत वाढ केली. पण, अखेरच्या चेंडूवर पोलार्डनं टोलावलेला चेंडू अडवून मयांक अग्रवालनं संघासाठी चार धावा वाचवल्या. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला अन् मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.
Web Title: The Return of IPL's Mystery Girl; Twitter Smitten by Spectator at MI vs KXIP Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.