ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) नुकतेच नव्या पुरस्काराची घोषणा केली पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन ही नावं आघाडीवर होती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रमुख खेळाडू जायबंदी होऊन संघाबाहेर होत असताना टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक करतान २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या बेंच स्ट्रेंथची खरी कसोटी होती आणि त्यावर ते सर्व खरे उतरले. दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असणाऱ्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) गॅबा कसोटीत टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व केलं आणि पाच विकेट्स घेत दमदार कामगिरीही केली. या मालिकेत सिराजनं भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या. Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल
रिषभ पंतनं ( Rishabh Pant) आपल्या कामगिरीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. सिडनी कसोटीतील ९७ धावा आणि गॅबा कसोटीतील नाबाद ८९ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला जबरदस्त कमबॅक करून दिलं. या मालिकेत त्यानं पाच डावांत २७४ धावा चोपल्या. याच मालिकेत वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन यांनीही कसोटी संघात पदार्पण केले. वॉशिंग्टननं गॅबावर शार्दूल ठाकूरसह खिंड लढवताना भारताच्या विजयाचा पाया रचला. टी नटराजनसाठी हा दौरा स्वप्नवत ठरला. याच दौऱ्यात त्यानं ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी संघांत पदार्पण केले. Video : तो मुक्का जीवावर बेतला; प्रतिस्पर्धीचा चेहऱ्यावर पंच अन् बॉक्सरचा दुर्दैवी मृत्यू
भारताच्या या शिलेदारांना ICCचा खास पुरस्कार मिळू शकत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) नुकतेच नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. ICC Player of the Month awards असे या पुरस्काराचे नाव असून प्रत्येकी महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंना तो दिला जाणार आहे. जानेवारी २०२१साठीच्या पहिल्याच पुरस्काराच्या शर्यतीत
मोहम्मद सिराज,
रिषभ पंत, टी नटराजन,
वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन ही नावं आघाडीवर होती. त्यांच्यासह रहमनुल्लाह गुरबाझ ( अफगाणिस्तान) , जो रूट ( इंग्लंड) , स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया), मॅरिझाने कॅप ( दक्षिण आफ्रिका), नॅदीन डी क्लेर्क ( दक्षिण आफ्रिका), निदा दार ( पाकिस्तान) आदी खेळाडूंची नावेही चर्चेत होती.
Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!
पण, आयसीसीनं यापैकी केवळ तीनच खेळाडूंना पात्र ठरवले असून त्याची यादी मंगळवारी जाहीर केली. जानेवारी महिन्याच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी आयसीसीनं तीन खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यात मोहम्मद सिराज, आर अश्विन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे नाव नाही. या तीन खेळाडूंमध्ये रिषभ पंत हा टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यासमोर इंग्लंडचा कर्णधार जो रूट व आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान आहे. जो रूटनं या महिन्यात दोन कसोटींत १०६.५०च्या सरासरीनं ४२६ धावा केल्या. आयर्लंडच्या स्टीर्लिंगनं वन डे सामन्यात १०५च्या सरासरीनं ४२० धावा चोपल्या, तर रिषबनं ८१.६६च्या सरासरीनं २४५ धावा केल्या.
KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी
Web Title: Rishabh Pant, Joe Root and Paul Stirling this three player shortlisted for ICC Player of the month
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.