- पहिली ट्वेंटी-२० - शिखर धवन ( ४) व लोकेश राहुल ( १), भागीदारी २ धावा
- दुसरी ट्वेंटी-२० - इशान किशन ( ५६) व लोकेश राहुल (०), भागीदारी ० धाव
- तिसरी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १५) व लोकेश राहुल ( ०), भागीदारी ७ धावा
- चौथी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १२ ) व लोकेश राहुल ( १४), भागीदारी २१ धावा
- पाचवी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( ६४) व विराट कोहली ( ८०*), भागीदारी ९४ धावा
India vs England, 5th T20 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलामीला चार वेगवेगळ्या जोड्यांचा प्रयोग करून पाहिला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला अंतिम ११ खेळाडूंची क्रमवारी निश्चित करण्यासाठी ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका होती. त्यामुळे विराटनं हे प्रयोग करून पाहिले. पहिल्या चारही सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul) याला कायम राखले गेले, परंतु त्यानं अनुक्रमे १, ०, ० व १४ अशा धावा केल्या. अखेरीस विराट स्वतः रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत सलामीला आला आणि टीम इंडियाला ९४ धावांची भागीदारी करून दिली. या सामन्यानंतर विराटनं यापुढे ट्वेंटी-20त रोहितसोबत सलामीला खेळण्यास आवडेल असे विधान केलं. त्यावर रोहितनंही प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीची सामन्यानंतर मोठी घोषणा; टीम इंडियाचेच नव्हे, तर RCBचे चाहते झाले खूश
रोहित म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोजकेच ट्वेंटी-20 सामने आम्हाला खेळण्यास मिळणार आहेत. आयपीएल आहेच. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाच सामन्यांच्या आधारावर काही ठरवलं जाणार नाही. हे पाच सामने स्वतःची कामगिरी चाचपडून पाहण्याची आणि संघ म्हणून आपण कुठे आहोत, हे पाहण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. पण, या मालिकेतून हीच अंतिम ११ जणांची फळी असेल हे निश्चित झालेले नाही. अजूनही वर्ल्ड कपला बरेच दिवस बाकी आहेत.'' विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...
''संघातील सध्याच्या खेळाडूंचा फॉर्म कसा आहे हे पाहणे गरजेचे आहे आणि कोणत्या परिस्थितीत, कोणत्या प्रतिस्पर्धीविरुद्ध कोणते अंतिम ११ शिलेदार उतरवायचे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. काहीवेळेतस अंतिम ११मध्ये सहा गोलंदाज असावेत असे वाटते आणि त्यामुळे एका फलंदाजाला बाकावर बसवावे लागते. जसजसा वर्ल्ड कप जवळ येईल, तेव्हा या सर्वा गोष्टींचा विचार केला जाईल. त्यामुळे जर विराट कोहलीसोबत सलामीला जाणं हे संघहिताचं असेल, तर त्याची अंमलबजावणी नक्की होईल,''असे रोहितनं स्पष्ट केलं. Record Break : ३२ धावांत संपूर्ण संघ तंबूत, ३४ वर्षीय जॅक्सन बर्डनं घेतल्या १८ धावांत ७ विकेट्स; मोडला १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम
आगामी आयपीएलमध्ये विराट कोहली RCBसाठी देवदत्त पडीक्कलसोबत सलामीला खेळणार निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहलीनं रोहित शर्मासह सलामीला खेळण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. या दोघांनी मजबूत पाया रचल्यानंतर टीम इंडियाच्या मधल्या फळीनं बिनधास्त खेळ केला. त्यामुळेच विराटनं आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाकडून सलामीला खेळणार असल्याचे जाहीर केले. ( Virat Kohli confirms he will be opening in IPL 2021 for RCB) Virat Kohli : विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम
विराट कोहली ८व्यांदा टीम इंडियासाठी सलामीला येणार आहे. जून २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध तो अखेरचा सलामीला आला होता. त्यानं सलामीवीर म्हणून ८ ट्वेंटी-20 सामन्यांत २७८ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे आणि इंग्लंडविरुद्धची नाबाद ८० धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. विराट कोहली भडकला, वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट सुटला, Video
Web Title: Rohit Sharma said if opening with Virat Kohli is right thing for the team then they'll go ahead with that
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.