IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

IPL 2020 : त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही - विराट कोहली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:56 PM2020-09-17T16:56:59+5:302020-09-17T17:03:31+5:30

whatsapp join usJoin us
Royal Challengers Bangalore to pay tribute to Covid Heroes through IPL 2020  | IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे21 सप्टेंबरला RCB आपला पहिला सामना खेळणारRCB यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज

विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघ Indian Premire League ( IPL 2020) जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL भारताबाहेर म्हणजेच संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येत आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत UAEत ही स्पर्धा होणार आहे. पण, या लीगमध्ये RCBसंघ कोरोना वॉरियर्सचा अनोख्या पद्धतीनं सन्मान करणार आहे. विराटनं ( Virat Kohli) गुरूवारी त्यासंदर्भातील घोषणा केली. या संपूर्ण स्पर्धेत RCBच्या खेळाडूंच्या जर्सीवर 'My Covid Heros' असे लिहिलेले पाहायला मिळणार आहे.

युझवेंद्र चहलच्या संघानं विराट कोहलीला हरवलं; सराव सामन्यात AB de Villiers ची फटकेबाजी, Video

विराट म्हणाला की,''या स्तुत्य उपक्रमात एक टीम म्हणून आम्ही प्रथमच सहभागी होत आहोत. कोरोना व्हायरसच्या संकटात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांची सेवा केली, हा उपक्रम त्यांना समर्पित आहे. RCBकडून आम्ही त्यांना सलाम करतो. ही जर्सी परिधान करताना, आम्हालाच अभिमान वाटत आहे. त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. मागील सात महिने मी माझ्या सोसायटीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहतोय. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्याकडे पर्याय होता, परंतु त्यांनी कामापासून पळ काढला नाही.''

महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video

रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स 

चेअरमन संजीव चूडीवाला यांनी सांगितले की,''खेळाडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि सरावातही ही जर्सी घालणार आहेत. पहिल्या सामन्यातील जर्सींचे लिलाव होणार आहे आणि त्यातून उभा राहणारा निधी 'Give India Foundation'ला दिला जाईल.''    

पाहा व्हिडीओ...



संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)
21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( RCB Team for IPL 2020) 
एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा, ख्रिस मॉरिस

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान

ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम 

धक्कादायक; मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचा करोनामुळे मृत्यू

Web Title: Royal Challengers Bangalore to pay tribute to Covid Heroes through IPL 2020 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.