विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएलच्या सध्याच्या सीझनमध्ये दमदार सुरुवात केलीय. आयपीएलच्या १४ व्या सीझनमध्ये आतापर्यंत कोहली ब्रिगेडनं पाच सामने खेळले आहेत आणि यात चार सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे यंदा आरसीबीनं पहिले चारही सामने जिंकण्याची किमया केली. आरसीबीचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान विराट कोहलीसमोर सध्या एक सवाल देखील उपस्थित झाला आहे. अवघ्या ३७ चेंडूत दमदार शतक ठोकलेल्या खेळाडूला विराट कोहली आपल्या संघात केव्हा संधी देणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यात भारताच्या या युवा खेळाडूला संधी दिली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (royal challengers bangalore player mohammed azharuddeen may play against delhi capitals ipl 2021 virat kohli)
तो धावला अन् वाऱ्याच्या वेगानं चेंडू टाकला...१६१.८ kph; 'रावळपिंडी एक्स्प्रेस'नं आजच्याच दिवशी घडवला होता इतिहास!
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं यंदाच्या सीझनसाठीच्या खेळाडूंच्या लिलावात मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddeen) या युवा खेळाडूला २० लाखांची बोली लावून संघात सामील करुन घेतलं. भारताच्या या युवा खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. मोहम्मद अझरुद्दीन केरळचा युवा फलंदाज असून मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यानं ५४ चेंडूत ९ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांच्या जोरावर तब्बल १३७ धावांची तुफान खेळी साकारली होती. यात त्यानं आपलं शतक अवघ्या ३७ चेंडूत पूर्ण केलं होतं.
डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती
भारतीय फलंदाजांच्या यादीत टी-२० विश्वात सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत अझरुद्दीन याचा तिसरा क्रमांक लागतो. याआधी रिषभ पंत यानं ३२ चेंडूत तर रोहित शर्मानं ३५ चेंडूत शतक ठोकण्याची किमया साधली होती.
केरळच्या शिरपेचात मानाचा तुरा
मोहम्मद अझरुद्दीन केरळच्या कारगोड जिल्ह्यातील थलांगरा गावचा रहिवासी आहे. २०१५ सालापासून तो केरळसाठी खेळतोय. आतापर्यंत टी-२० मध्ये २५ सामन्यांमध्ये २२.५५ च्या सरासरीनं १४२.२७ च्या स्ट्राइक रेटनं ४५१ धावा कुटल्या आहेत. मोहम्मद अझरुद्दीन एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. मोहम्मद अझरुद्दीन एक सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि मुंबई विरुद्धच्या सामन्यात सलामीला येऊनच त्यानं विक्रमी खेळीची नोंद केली होती. दरम्यान, आरसीबीच्या संघात सलामीजोडीची धुरा कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या खांद्यावर आहे. दोघंही सध्या तुफान फॉर्मात आहेत. तर यष्टीरक्षक म्हणून एबी डीव्हिलियर्सचा संघात समावेश आहे. त्यामुळे मोहम्मद अझरुद्दीनला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
Web Title: royal challengers bangalore player mohammed azharuddeen may play against delhi capitals ipl 2021 virat kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.