RR vs RCB Latest News : शाह'बाज' चा सुपर डुपर झेल; स्टीव्ह स्मिथची काढली विकेट; पाहा व्हिडीओ

IPL 2020त सातत्यानं अपयशी ठरलेल्या रॉबीन उथप्पाला RRने बेन स्टोक्ससह सलामीला पाठवण्याचा डाव खेळून जोस बटलरवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली. बटलरला मोठी खेळी करता आली नसली तरी कर्णधार स्टीव्ह स्मिथची बॅट आज तळपली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 05:30 PM2020-10-17T17:30:39+5:302020-10-17T17:31:06+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB Latest News : Shahbaz Ahmed with a stunning catch on the boundary line to dismiss Steve Smith | RR vs RCB Latest News : शाह'बाज' चा सुपर डुपर झेल; स्टीव्ह स्मिथची काढली विकेट; पाहा व्हिडीओ

RR vs RCB Latest News : शाह'बाज' चा सुपर डुपर झेल; स्टीव्ह स्मिथची काढली विकेट; पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. RRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IPL 2020त सातत्यानं अपयशी ठरलेल्या रॉबीन उथप्पाला RRने बेन स्टोक्ससह सलामीला पाठवण्याचा डाव खेळून जोस बटलरवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली. बटलरला मोठी खेळी करता आली नसली तरी कर्णधार स्टीव्ह स्मिथची बॅट आज तळपली. उथप्पाही फॉर्मात परतला. यांच्या फटकेबाजीनं RRला मोठा पल्ला गाठून दिला. पण, या सामन्यात पदार्पणवीर शाहबाज अहमदनं घेतलेल्या सुपर डुपर झेलची चर्चा रंगली.

उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. त्यानं पदलालित्य दाखवत सुरेख फटके मारले. बेन स्टोक्स संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु ख्रिस मॉरिसनं टाकलेल्या सहाव्या षटकात स्टोक्स ( १५) बाद झाला. IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर सुहाना खानचे फोटो व्हायरल

विराट कोहलीनं ८वे षटक युझवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलनं RRला मोठा धक्का दिला. त्यानं २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४१ धावा करणाऱ्या उथप्पाला माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर सॅमसनही ( ९) बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. ख्रिस मॉरिसनं ही भागीदारी तोडली. जोस बटलर २४ धावांवर माघारी परतला. पण, स्मिथनं एका बाजूनं फटकेबाजी करताना ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 


स्मिथ आणि राहुल टेवाटिया यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर शाहबाज अहमदनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. टेवाटिया १९ धावांवर नाबाद राहिला. 

पाहा शाहबाजची सुपर कॅच

Web Title: RR vs RCB Latest News : Shahbaz Ahmed with a stunning catch on the boundary line to dismiss Steve Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.