भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला. आठ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. एडन मार्करमच्या नेतृत्वातील आफ्रिकन संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारताशी दोन हात करेल. यजमानांनी मधल्या फळीत हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर यांना कायम ठेवले, तर अनुभवी गोलंदाज कगिसो रबाडाला विश्रांती देण्यात आली आहे.
अलीकडेच BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मयंक यादव आणि शिवम दुबे यांची संघात निवड केलेली नाही. दुखापतीमुळे त्यांना वगळण्यात आले आहे. रियान परागदेखील उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. संजू सॅमसनचे संघातील स्थान कायम आहे. तसेच अभिषेक शर्मालाही संधी देण्यात आली आहे. नितीश कुमार रेड्डी सोबतच रमणदीप सिंग, विजय कुमार आणि यश दयाल यांना संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -
एडन मार्करम (कर्णधार), रीझा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, रॅन रिकेल्टोन, डेव्हिड मिलर, डोनोवान फेरारिया, मार्को जान्सेन, पॅट्रिक कृगार, गेराल्ड कोएत्झी, ओटनेइल बर्थमॅन, अँडिले सिमिलेन, केशव महाराज, मिहिली म्होगवाना, नकबा पेटर, लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी).
भारताचा संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल.
Web Title: sa vs ind t20 series South Africa announce squad for T20I series against India, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.