सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:18 PM2020-07-29T16:18:44+5:302020-07-29T16:19:28+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev | सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. पण, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला एकही त्रिशतक झळकावता आलेले नाही. भारताच्या माजी फलंदाजाच्या नावावर 6 द्विशतक आहे, परंतु त्याला एकदाही 250 धावांचा पल्ला पार करता आला नाही. 2004मध्ये बांगलादेशविरुद्धची 248 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही. भारतीच संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यामागचं कारण सांगितलं. वर्ल्ड कप विजेत्या कपिल देव यांनी सांगितले की,''तेंडुलकर निर्दयी फलंदाज नव्हता आणि त्याला शतकाचे मोठ्या खेळीत रुपांतर कसे करायचे, हे माहीत नव्हते. तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत किमान तीन त्रिशतकं झळकवायला हवी होती.'' 

''सचिनकडे असलेलं कौशल्य मी कुणा दुसऱ्या खेळाडूत पाहिले नाही. शतक कसं झळकवायचं हे त्याला माहित होतं, परंतु तो कधीच निर्दयी फलंदाज बनला नाही. क्रिकेटसाठी जे हवं, ते सर्व सचिनकडे होतं. पण, त्याला शतकाचे 200 आणि 300 धावांत रुपांतर करणे माहित नव्हतं. सचिन तीन तिहेरी शतक आणि 10 दुहेरी शतक आणखी झळकावू शकत होता. तो जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटूला प्रत्येक षटकात सहज चौकार मारत होता,''असंही त्यांनी सांगितले.

ICC World Super League : 2023च्या वर्ल्ड कप पात्रता फेरीला गुरुवारपासून सुरुवात; जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

तेंडुलकरनं 200 कसोटीत 15921 धावा केल्या आहेत. कसोटीत 15 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तेंडुलकरला स्थानिक क्रिकेटमध्येही तिहेरी शतक झळकावता आलेलं नाही. तेंडुलकरचे समकालीन खेळाडू कुमार संगकाराने 11, तर ब्रायन लारानं 9 द्विशतकं झळकावली आहेत. कसोटीत 400 धावा करणारा लारा हा एकमेव फलंदाज आहे. विराट कोहलीनं 100 कसोटीत 7 द्विशतकं झळकावली आहेत, तर वीरेंद्र सेहवागनं 6 द्विशतकं आणि दोन त्रिशतकं झळकावली आहेत. 

तेंडुलकरनं 463 वन डे सामन्यांत 44.83च्या सरासरीनं 18426 धावा केल्या आहेत. त्यात 49 शतकांचा समावेश आहे. वन डे द्विशतक झळकावणारा तेंडुलकर हा पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात! 

KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!

एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!

IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!

Web Title: Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.