बलवीर चंद या नावानं या व्यक्तीला फार कमीच जणं ओळखत असतील. पण, 50 वर्षीय ही व्यक्ती महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा डुप्लिकेट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. बलवीर यांनी अनेक जाहीरातींमध्येही काम केलं आहे. मुंबईच्या एका फूड चेनचा तो सदिच्छादूतही होता, परंतु तो मुळचा पंजाब येथील सहलोन गावातील आहे. लॉकडाऊनमुळे 50 वर्षीय बलवीरला नोकरी गमवावी लागली आहे.
फूड चेन कंपनीनं लॉकडाऊनच्या काळात कामगार कपात केली आणि त्यात बलवीरचाही समावेश होता. बलवीर वरील संकट इथेच संपले नाही, तर मुंबईहून गावी परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली आणि त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
''लॉकडाऊनमुळे फूड चेन उद्योगाला फटका बसला आणि त्यांनी अनेकांना कामावरून काढले. मलाही कामावरून काढण्यात आले. परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा कामावर रुजू करू असे त्यांनी सांगितले,'' अशी माहिती बलवीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. कोरोनाच्या संकटात अनेक कामगारांनी जन्मगावी जाण्यास प्राधान्य दिले. त्यात बलवीरचाही समावेश होता. तो, त्याची पत्नी आणि तीन मुलांसह गावी परतला.
तो म्हणाला,''आम्ही सर्व काळजी घेतली होती. सॅनिटायझरच्या 15 बॉटल्स, N95 मास्क आणि घरचं जेवण घेऊन आम्ही प्रवास केला. पण, इथे अनेक प्रवासी होते, की त्यांनी नियामंची एैशीतैशी केली. सध्याच्या घडीला प्रवास करणे सुरक्षित नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान
पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!
सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!
भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन
गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह
नताशाच्या प्रेमात हार्दिक पांड्या बनला 'बावर्ची'; बनवली स्पेशल डिश
Read in English
Web Title: Sachin Tendulkar Doppelganger Balvir Chand Loses Job Amid Pandemic, Tested Postive for Coronavirus
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.