दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याची माहिती दिली आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात धाकधुक वाढली. त्याची प्रकृती सुधरावी यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी यांनीही तेंडुलकरला लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या. सचिननं ट्विट केलं होतं की, ,''तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार. वैद्यकिय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. काही दिवसांतच घरी पुन्हा येईल, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. वर्ल्ड कप विजयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा. '' IPL 2021पूर्वी भारतीय फलंदाजानं चोपल्या २९ चेंडूंत १४४ धावा, पुण्याच्या खेळाडूची १४ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी
तेंडुलकरच्या बालपणाच्या मित्रानं त्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अतुल रानडे ( Atul Ranade) यांनी सांगितले की, चाहत्यांनी चिंता करण्याची कारण नाही. हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळतील म्हणून तो तेथे दाखल झाला आहे. त्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे होते. तेथे मशीन्स व अन्य सर्व साहित्य उपलब्ध आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून तो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला आहे.''
वसीम अक्रम काय म्हणाले?
या ट्विटनंतर त्याची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असे मॅसेज येत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यानंही ट्विट करून सचिनच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. ''१६व्या वर्षी तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मोठ्या धैर्यानं सामना केलास. मला खात्री आहे की तू कोव्हीड-१९लाही सीमापार टोलावशील. लवकर बरा हो मास्टर. २०११च्या वर्ल्ड कप विजयाच्या १०व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सच्या स्टाफसोबत केल्यास आनंद होती. त्याचे फोटो पाठवायला विसरू नकोस.''
Read in English
Web Title: Sachin Tendulkar's hospitalisation only a 'precautionary measure', no need to worry: Childhood friend
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.