ठळक मुद्देजुलै 2019पासून महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेआयपीएलमधून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा त्याचा मानस होता
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही काळ घरातच बसावे लागणार आहे. अशाच घरी बसलेल्या लोकांकडून बुधवारी सोशल मीडियावर #DhoniRetires हे ट्रेंड करण्यात आले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जुलै 2019पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, गेली बरीच दिवस थांबलेल्या चर्चा काल अचानक पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे धोनीची पत्नी साक्षी भडकली. लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे विधान केलं. पण, तिनं ट्विट नंतर डिलीट केलं.
धोनीच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल अजूनही स्पष्टता नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटले होते. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आहे. बुधवारी अचानक ट्विटरवर #DhoniRetires हा ट्रेंड व्हायरल झाला.
साक्षीनं ट्विट केलं की,''या अफवा आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल आहे, हे मी समजू शकते.''
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव
आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!
Web Title: Sakshi Dhoni quashes 'mentally unstable' rumours of MS Dhoni's retirement svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.