IND vs SA Final : शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी? फायनलमध्ये टीम इंडिया करू शकते बदल 

भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने उद्या मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:44 PM2024-06-28T21:44:46+5:302024-06-28T21:45:18+5:30

whatsapp join usJoin us
Sanju Samson for Shivam Dube in T20 World Cup Final? check Predicted India Playing XI vs SA | IND vs SA Final : शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी? फायनलमध्ये टीम इंडिया करू शकते बदल 

IND vs SA Final : शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी? फायनलमध्ये टीम इंडिया करू शकते बदल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final India vs South Africa : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने उद्या मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील वर्षभरात आयसीसी स्पर्धेची तिसरी फायनल खेळणार आहे. WTC फायनल आणि वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे दुःख विसरून टीम इंडियाने उभारी घेतली. रोहित अँड टीमसमोर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित मालिका कायम राखली आणि निर्विवाद वर्चस्व गाजवून फायनल गाठली. तरीही संघात अजूनही काही त्रुटी आहेत आणि त्या सोडवणे गरजेचे आहे.


कुलदीप यादवला सुपर ८ मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना त्याने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान पक्के केले आहे. शिवम दुबे व विराट कोहली यांचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंताजनक आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आता बदल करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. मात्र, तरीही शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये उद्या स्थान टिकवता येईल का, याची उत्सुकता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत विराटला तिसऱ्या क्रमांकावरून ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय फार यशस्वी ठरल्याचे दिसत नाही. पण, फायनलमध्ये त्याला बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार नाही.


आयपीएल २०२४ मध्ये विराटने १५ सामन्यांत सर्वाधिक ७४१ धावा केल्या, परंतु वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला १०.७५च्या सरासरीने फक्त ७५ धावाच करता आल्या आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय झाल्यास, ओपनिंगला कोण हा प्रश्न उद्भवतो. अशा परिस्थितीत रिषभ पंत व रोहित हा ओपनिंग पर्याय ठरू शकतो. विराट तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.  


शिवम दुबेला या स्पर्धेत फार चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि त्याच्या जागी संजू सॅमसन हा पाचव्या क्रमांकावर योग्य फलंदाज ठरू शकतो. दुसरा पर्यात असा की रोहित व यशस्वी जैस्वाल ओपनिंगला येऊ शकतात आणि शिवमच्या जागेवार पाचव्या क्रमांकावर रिषभ पंतला खेळवले जाऊ शकते.    

Web Title: Sanju Samson for Shivam Dube in T20 World Cup Final? check Predicted India Playing XI vs SA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.