Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!

Sarfaraz Khan Wicket, Devon Conway Catch Video, IND vs NZ 1st Test: सर्फराज खानसह एकूण ५ भारतीय फलंदाज शून्यावर गेले माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:24 PM2024-10-17T13:24:31+5:302024-10-17T13:27:07+5:30

whatsapp join usJoin us
Sarfaraz Khan Wicket as Devon Conway Jumps in the air takes fantastic one handed catch IND vs NZ 1st Test | Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!

Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sarfaraz Khan Wicket, Devon Conway Catch Video, IND vs NZ 1st Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण भारताचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जाडेजा, रवी अश्विन, रिषभ पंत यांसारखे अनुभवी फलंदाज काहीही कमाल करु शकले नाहीत. यशस्वी जैस्वाल आणि नवखा सर्फराज खान यांनीही चाहत्यांना निराश केले. यातील सर्फराज खान बाद झाला त्यावेळी डेवॉन कॉन्वेने पकडलेला झेल अप्रतिम होता. या कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यावर मुंबईकर यशस्वी जैस्वालची साथ द्यायला त्याचाच मुंबईचा साथीदार सर्फराज खान आला होता. सर्फराज आणि यशस्वी डाव सावरतील अशी चाहत्यांना आशा होती. पण तसे होऊ शकले नाही. चेंडू स्विंग होत असूनही तिसऱ्याच चेंडूवर त्याने हवेत फटका मारायचा प्रयत्न केला. शॉर्ट मिडऑनला डेवॉन कॉन्वे फिल्डिंग करत होता. चेंडू हवेत जाताच कॉन्वेने हवेत झेप घेतली अन् एका हाताने अफलातून झेल घेतला. चेंडू बराच वेगात होता, पण तरीही कॉन्वेने अंदाज घेऊन झेल पूर्ण केला. पाहा व्हिडीओ-

भारताचा पहिला डाव अत्यंत खराब झाला. सलामीवीर रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन पाचही फलंदाज शून्यावर माघारी परतले. यशस्वी जैस्वालने १३ धावा केल्या. तर रिषभ पंतने झुंज देत कशाबशा २० धावा केल्या. जसप्रीत बुमराहदेखील १ धाव काढून बाद झाला.

Web Title: Sarfaraz Khan Wicket as Devon Conway Jumps in the air takes fantastic one handed catch IND vs NZ 1st Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.