MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं मंगळवारी मोठा खुलासा केला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विराट कोहलीचा माझ्या नावाला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:24 PM2020-08-04T13:24:48+5:302020-08-04T13:25:19+5:30

whatsapp join usJoin us
'Selectors are not looking at you' - What MS Dhoni told Yuvraj Singh ahead of 2019 World Cup | MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं मंगळवारी मोठा खुलासा केला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विराट कोहलीचा माझ्या नावाला पांठीबा होता, परंतु महेंद्रसिंग धोनीनं मला स्पष्टच सांगितले की, वर्ल्ड कप साठीच्या संघात तुझ्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे युवीनं सांगितले. युवीनं 2017मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता. कॅन्सरवर मात करून युवीनं त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं आणइ कटक येथे इंग्लंडविरुद्ध 150 धावांची दमदार खेळीही केली होती. (Yuvraj Singh has revealed what MS Dhoni told him ahead of 2019 World Cup)

युवी 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता आणि त्यात त्यानं पाकिस्तानविरुद्ध 53 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघात स्थान न मिळाल्यानं त्यानं निवृत्ती जाहीर केली. त्यानं नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''मी संघात पुनरागमन केलं, तेव्हा विराट कोहलीनं मला साथ दिली. त्यानं मला पाठींबा दिला नसता, तर कदाचित मी कमबॅकही करू शकलो नसतो. पण, त्यानंतर धोनीनं मला 2019च्या वर्ल्ड कप बाबतचं खरं चित्र सांगितलं. त्यानं सांगितलं की निवड समिती वर्ल्ड कपसाठी तुझ्या नावाचा विचार करत नाही.'' (Yuvraj Singh has revealed what MS Dhoni told him ahead of 2019 World Cup)

2011च्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवीला दुसरा वर्ल्ड कप खेळता आला नाही. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यात तो फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे त्याला त्याही वर्ल्ड कपमध्ये खेळता आले नाही. त्यानं रणजी क्रिकेटमध्ये तीन शतक झळकावली होती. एवढं होऊनही धोनीबाबत कोणतीच तक्रार नसल्याचे युवीनं स्पष्ट केलं. ''2011च्या वर्ल्ड कप पर्यंत धोनीचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता आणि तू संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहेस, असं तो मला सांगायचा,''असेही युवी म्हणाला.

2012नंतर युवी भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. त्यानंतर त्यानं तीन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळले, परंतु वन डे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला. 2014-15च्या मोसमात युवीनं रणजी करंडक स्पर्धेत सलग तीन शतकं झळकावली, तरीही 2015च्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संघात त्याचा विचार केला गेला नाही. 2017मध्ये त्यानं कमबॅक केलं, परंतु सात महिन्यांनंतर त्याला वगळले गेले. याकाळात त्यानं 11 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामने खेळले.  (Yuvraj Singh has revealed what MS Dhoni told him ahead of 2019 World Cup)

युवीनं 304 वनडे सामन्यांत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या.  58 ट्वेंटी-20 सामन्यांत 1177 धावा आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्यानं 40 कसोटी सामन्यांतही प्रतिनिधित्व केलं. 

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

 

Web Title: 'Selectors are not looking at you' - What MS Dhoni told Yuvraj Singh ahead of 2019 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.