मुंबई - बॉलिवूड अभिनेत्रीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटूंना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या सट्टेबाजांशी झालेल्या भेटीमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये ही अभिनेत्री आणि तीन सट्टेबाजांची भेट झाली होती. यावेळी मॅचफिक्सिंग आणि स्पॉटफिक्सिंग करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या जाळ्यात ओढण्याची जबाबदारी या अभिनेत्रीकडे सोपवण्यात आली होती.
यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात केलेल्या उल्लेखानुसार या अभिनेत्रीने दोन भारतीय क्रिकेटपटूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन्ही क्रिकेपटूंनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. या अभिनेत्रीच्या बुकींशी असलेल्या संबंधांबाबत कुणकुण असल्याचे या क्रिकेटपटूंनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे.
या अभिनेत्रीसोबत ज्या तीन सट्टेबाजांचा संपर्क होता. त्यापैकी एक सट्टेबाज हा मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. तर दोन सट्टेबाज हे गुजरातमधली खंबात येथी रहिवाशी आहेत. हे तिन्ही बुकी गेल्या काही महिन्यांपासून दुबईमध्ये वास्तव्यास असून, भारतीय तपास यंत्रणांचे हात आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून ते तिथूनच ते आपला कारभार चालवत आहेत.
धक्कादायक... लोकसभा निवडणुकीतही 'हनी ट्रॅप' व्हिडीओंची सौदेबाजी; विरोधकांशी संपर्क
राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Shocking: ट्वेंटी-20 सामन्यावर 225 कोटींचा सट्टा, BCCI करणार चौकशी
हनिट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी टार्गेट करण्यात आलेल्या दोन भारतीय क्रिकेटपटूंशी अधिकाधिक जवळीक साधून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोच वाढव, असा सल्ला या सट्टेबाजांनी संबंधित अभिनेत्रीला दिला होता. ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोच वाढवणे याचा अर्थ सामन्यादरम्यान ड्रेसिंगरूममधील सर्व माहिती सट्टेबाजांपर्यंत पोहोचवायची. दरम्यान, या अभिनेत्रीने दोन्ही क्रिकेटपटूंची अनेकदा भेट घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत सेल्फीही घेतल्या होत्या. तसेच या अभिनेत्रीने दुबईमध्ये बुकींसोबतसुद्ध अनेक फोटो काढले होते.
संशयाच्या फेऱ्यात असलेल्या बुकींपैकी एका बुकीवर मध्य प्रदेशात झालेल्या क्रिकेट सामन्याचे सॅटेलाइट सिग्नल हॅक करण्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. या बुकीने हॅक सिग्नलच्या माध्यमातून आपल्या कुठल्यातरी संकेतस्थळावरून आयपीएलच्या एका सामन्याचे थेट प्रसारण केले होते. या बुकीचे दुबईमध्ये दोन क्लब असून, तिथे भारतातील मोठमोठे बुकी एकत्र येत असतात.
दरम्यान, एखाद्या बुकीसोबत झालेली भेट ही योगायोग असू शकतो. मात्र तीन तीन सट्टेबाजांसोबत अभिनेत्रीने एकत्र भेट घेतल्याने तिच्याबाबत संशय निर्माण झाला आहे. सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांवरून आतातपर्यंत डझनभर क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आलेली आहे.
Web Title: Sensational! An Bollywood actress tries to seduce two Indian cricketers into a honey trap
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.