न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ( NZC) अखेरच्या मिनिटाला दौरा रद्द करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) मोठा धक्का दिला. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता आणि आजपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार होती. पण, न्यूझीलंड गुप्तचर विभागानं दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली आणि NZCनं दौराच रद्द केला. आता न्यूझीलंडचे क्रिकेटपटू मायदेशासाठी रवाना होणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचा हा निर्णय पाकिस्तानी खेळाडू व पाठिराख्यांना फार आवडला नाही. त्यात माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi ) आणि माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ) यांनी तीव्र संताप व्यक्त करताना न्यूझीलंड क्रिकेटला खडेबोल सुनावले. ( Shahid Afridi called the security alert a "hoax" while Shoaib Akhtar said, “New Zealand just killed Pakistan cricket” after their last-minute pullout from the tour)
या मालिकेपूर्वी पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे व पाकिस्तान सुपर लीगचे यशस्वी आयोजन करून दाखवले होते. पण, तरीही न्यूझीलंडनं माघार घेतली. त्यांच्या या निर्णयानं इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनं तर न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानं धडाधड ट्विट करताना न्यूझीलंडवर टीका केली. त्यानं लिहीलं की,'ख्राईस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्यात ९ पाकिस्तानी लोकांची हत्या झाली, तरीही पाकिस्तानी तुमच्या मागे ठामपणे उभे राहिले. कोरोना संकटातही पाकिस्ताननं न्यूझीलंड दौरा केला. त्या दौऱ्यावर न्यूझीलंड अधिकाऱ्यांनी आम्हाला कठोर वागणुक दिली.
शाहिद आफ्रिदी म्हणाला,''सर्व सुरक्षा पुरवूनही फक्त खोट्या माहितीच्या आधारावर तुम्ही हा दौरा रद्द केला. न्यूझीलंड क्रिकेट तुम्हाला या निर्णयाचे परिणाम काय होतील हे माहित्येय?
Web Title: Shahid Afridi called the security alert a "hoax" while Shoaib Akhtar said, “New Zealand just killed Pakistan cricket” after their last-minute pullout from the tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.