संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी संपूर्ण किंवा अंशतः लॉकडाऊनचा पर्याय अवलंबवला आहे. पण, या निर्णयाचा समाजातील सर्वाधिक कमकुवत घटकाला फटका बसला आहे. ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार आणि समाजातिल काही प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यापरीनं या घटकाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनंही पाकिस्तानातील 200 कुटुंबीयांना रेशन पुरवण्याचं सामाजिक काम केलं आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 900 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिदीनं पुढाकार घेऊन देशातील गरीब व गरजुंना रेशन पुरवण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यानं आतापर्यंत 200 कुटुंबीयांना धान्य पुरवले आहे. आफ्रिदीच्या फाऊंडेशनच्या या मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही आफ्रिदीचे कौतुक केले आहे.
एरवी आफ्रिदी आणि भज्जी यांच्यात रंगणारे द्वंद्व सर्वांनी पाहिले आहे. पण, आफ्रिदीच्या समाजकार्याने दोघांमधील कटुता नष्ट केली आहे. भज्जीनं मोठ्या मनानं आफ्रिदीच्या कामाचं कौतुक केलं. तो म्हणाला,''मानवतेच्या दृष्टीनं तू चांगलं काम करत आहेत. समाजकार्य करण्यासाठी देव तुला आणखी ताकद देईल.''
आफ्रिदीनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, आरोग्य मंत्री जाफर मिर्झा यांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.
आफ्रिदीचे हे समाजकार्य पाहून पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी आफ्रिदी फाऊंडेशनला
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण
Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान
वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार
Web Title: Shahid Afridi provides ration to 2000 families in Pakistan, Harbhajan Singh pays respect svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.