पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं ICCकडे तक्रार केली आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. त्यातील एका नियमानं आफ्रिदीचा पारा चढला अन् त्यानं थेट ICCकडे तक्रार केली. कोरोनाच्या नियमांपूर्वी गोलंदाज त्याची टोपी, सनग्लास, स्वेटर आणि अन्य वस्तू मैदानावरील अम्पायरकडे देत होते, परंतु आता नियम बदलले आणि अम्पायर यापैकी कोणतीही वस्तू गोलंदाजाची आपल्याकडे ठेवत नाही. चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!
पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) आफ्रिदी मुल्तान सुल्तान्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि सामन्यात गोलंदाजी करण्यापूर्वी अम्पायरनं त्याची टोपी घेण्यास नकार दिला. आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार अम्पायरही बायो-बबलमध्ये असतात. मग त्यांना खेळाडूंची टोपी किंवा अन्य वस्तू सांभाळण्यास हरकत नसायला हवी. आफ्रिदीनं ट्विट केलं की,''खेळाडू आणि अम्पायर एकाच बायो-बबलमध्ये राहत असताना गोलंदाजाची टोपी अम्पायर का सांभाळू शकत नाही, याचे आश्चर्य वाटतं. सामन्यानंतर ते खेळाडूंशी हात मिळवणी करतात, त्याचं काय?''
आयसीसीनं जुलै २०२०/२१ पासून सुरू झालेल्या क्रिकेटच्या नव्या मोसमासाठी काही नियम आणले. खेळाडू आणि अम्पायर यांनी मैदानावर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. खेळाडूंनी त्यांच्या वस्तू अम्पायरकडे किंवा सहकाऱ्याकडे देऊ नये.'' असे असले तरी सामन्यात खेळाडू दोन-दोन कॅप घातलेले पाहायला मिळतात.
Web Title: Shahid Afridi questions ICC after umpire refuses to take his cap owing to COVID-19 rules
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.