भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अमान्य केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ आता डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. भारतीय खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी कमी असावा अशी विनंती गांगुलीने केली होती. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मागणी फेटाळून लावली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त मुख्य कार्याकारी अधिकारी निक हॉकली यांनी खेळाडूंना दोन आठवड्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावाच लागेल, असे स्पष्ट केले. खेळाडूंसाठी क्वारंटाईन सेंटर मध्ये सरावासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येतील. "दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी निश्चित आहे. या क्वारंटाईन सेंटमध्ये खेळाडूंना सरावासाठी सर्व सुविधा देण्याची आम्ही काळजी घेतली आहे. त्यामुळे सामन्याच्या तयारीत व्यत्यय येणार नाही. आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाणार आहे,"असेही हॉकली यांनी सांगितले.
हे क्वारंटाईन सेंटर नक्की कुठे असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. "खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना स्टेडियममधील हॉटेल किंवा नजीकच्या हॉटेलमध्ये त्यांची सोय केली जाईल. एडलेड ओव्हलमध्ये ती सुविधा आहे.''
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
३ डिसेंबरपासून : पहिली कसोटी, ब्रिस्बेन
११ डिसेंबरपासून : दुसरी कसोटी, अॅडिलेड (डे नाईट)
२६ डिसेंबरपासून : तिसरी कसोटी, मेलबोर्न
३ जानेवारीपासून : चौथी कसोटी, सिडनी
१२ जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
१५ जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना, मेलबोर्न
१७ जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज
आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!
Web Title: Sourav Ganguly's request denied, Team India to go 2 week quarantine in australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.