SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहेत. KKRचे सर्व सामने झाले आहेत आणि त्यांचे भविष्य आजच्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि SRH यांच्या लढतीवर अवलंबून आहे. MIनं आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास KKR १४ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरेल, परंतु SRHनं बाजी मारल्यास चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर डेव्हिड वॉर्नरचा संघ चौथे स्थान पटकावेल. त्यामुळे आजच्या सामन्यात KKRचे चाहते MIला चिअर करताना दिसतील.
दुखापतीमुळे चार सामने बाकावर बसलेल्या रोहित शर्माचे आज संघात कमबॅक झाले. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, रोहितचं कमबॅक मुंबई इंडियन्सला फार फायद्याचे ठरले नाही. संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात रोहितला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं चौकारानं खातं उघडलं. संदीप शर्मानं टाकलेल्या पाचव्या षटकात क्विंटन डी'कॉकनं ४,६,६ अशा धावा कुटल्या, परंतु चौथ्या चेंडूवर क्विंटन दुर्दैवी त्रिफळाचीत झाला. क्विंटन २५ धावा करून माघारी परतला.
IPL पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम संदीप शर्मानं नावावर केला. क्विंटन डी'कॉकच्या विकेटसह संदीप शर्मानं IPL मध्ये १५० विकेट पूर्ण केल्या.
संदीप शर्मा - ५३*
झहीर खान - ५२
भुवनेश्वर कुमार - ४८
उमेश यादव - ४५
धवल कुलकर्णी - ४४
- मुंबई इंडियन्सच्या संघात तीन बदल; रोहित शर्मा, जेम्स पॅटिन्सन व धवल कुलकर्णी IN, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह OUT
- सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, वृद्घीमान साहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियांम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाद नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, इशान किशन, कृणाल पांड्या, किरॉन पोलार्ड, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी
Web Title: SRH vs MI Latest News : Sandeep Sharma took most wickets in IPL powerplay; break Zaheer Khan record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.