कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आयपीएल होणार की नाही असा संभ्रम क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. पण, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयनं आयपीएल स्थगिन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या 13व्या मोसमाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी सांगितले की,''आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयकडे प्रस्ताव ठेवत आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. त्यामुळे 2009 प्रमाणे त्यांनी आयपीएल परदेशात खेळवल्यास, त्याचा फायदा त्यांनाच होईल. श्रीलंकन क्रिकेट मंडळ त्यासाठी बीसीसीआयला सर्व सुविधा पुरवण्यासाठी तयार आहोत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन आम्ही करू.''
आयपीएल आयोजनानं श्रीलंका क्रिकेट मंडळालाही आर्थिक फायदा होईल.
दरम्यान, 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊन वाढला आणि आयपीएलवरील अनिश्चितता अधिक वाढली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,''कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारन लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं आयपीएल 2020 चे सत्र पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.''
''देशातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, ब्रॉडकास्टर, स्पॉन्सर्स आणि सर्व भागदारक यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेला आहे. देशातील परिस्थितीवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहोत,'' असेही शाह यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
Web Title: Sri Lanka ready to host IPL 2020, will provide all facilities for tournament, SLC to BCCI svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.